संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे विचार घेऊन जगले पाहिजे :प्रदीप मदने; नांद्रे येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात संपन्न
नांद्रे प्रतिनिधी :
संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे विचार घेऊन जगले पाहिजे संत रोहिदास महाराज यांनी जातिव्यवस्थेवर प्रहार केला. जातीयता गरीब श्रीमंत यांच्यामधील विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला ते विठ्ठल भक्त होते अंधश्रद्धेवर त्यांनी भरपूर काम केले. यातूनच रोहिदास महाराज यांचे साहित्य जन्माला आले. जाती व्यवस्थाचे चटके त्यांनी अभंग लिहले. त्यांना सहन करावे लागले असे प्रतिपादन एम एम ग्रुपचे महाराष्ट्र राज्याचे सदस्य प्रदीप मदने यांनी केले ते रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांद्रे येथे बोलत होते.
संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी युवा नेते महावीर अण्णा भोरे,एम एम.ग्रुपचे महाराष्ट्राचे सदस्य प्रदीप मदने,माजी ग्रामपंचायत सदस्य अरविंद कुरणे.ग्रामपंचायत सदस्य दिलीप मदने, प्रशिक काकडे डॉ महावीर नांद्रेकर, इंजि.विजय कांबळे, नांद्रे विकास सोसायटी चे माजी संचालक तानाजी मदने मंडळाचे अध्यक्ष अनिल कांबळे, मिलिंद कांबळे व सर्व मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.