Sanvad News भुवनेश्वरवाडीत माशाच्या जाळ्यात अडकली लांडोर, नावडी नितीन गुरव मदतीला धावले, अखेर चार दिवसांनी सुटका

भुवनेश्वरवाडीत माशाच्या जाळ्यात अडकली लांडोर, नावडी नितीन गुरव मदतीला धावले, अखेर चार दिवसांनी सुटका

 भुवनेश्वरवाडीत माशाच्या जाळ्यात अडकली लांडोर, नावडी नितीन गुरव मदतीला धावले, अखेर चार दिवसांनी सुटका


संवाद न्यूज भिलवडी प्रतिनिधी 

पलूस तालुक्यातील भुवनेश्वरवाडी भिलवडी येथे कृष्णाकाठी तासगांव नगरपरिषदेचे जैकवेल आहे.याठिकाणी असणाऱ्या ललीत कणसे भुवनेश्वरवाडी आणि गणेश खरांडे तासगांव या  कर्मचाऱ्यांना गेल्या चार दिवसात जवळच्या ऊसात एक लांडोर तडफडत उडताना दिसत होती.तिच्या पायात काहीतरी अडकल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी ही बाब नावाडी  नितीन गुरव यांच्या कानावर घातली. 

त्यानंतर नितीन गुरव यांनी या कर्मचाऱ्यांच्या मदतीने लांडोरीला मोठ्या कष्टाने पकडले.यावेळी तिच्या पायात मोठ्या प्रमाणात माशाचे जाळे अडकल्याचे त्यांच्या लक्षात आले. तिच्या चार दिवसांच्या तडफडतण्याने जाळीचा नायलॉन धागा पंख आणि पायात मोठ्या प्रमाणात आवळला होता. तो हाताने  निघता निघत नसल्याने  त्यांनी कटरच्या मदतीने नायलॉन धागे कापून लांडोरीची सुखरूप सुटका केली. अशाप्रकारे कृष्णाकाठचे देवदूत ठरलेल्या नितीन गुरव यांच्या मुळे या लांडोरचे प्राण वाचले आहेत.जाळ्यात जखडलेल्या लांडोरीला चार दिवस अन्न न मिळाल्यामुळे ती भलतीच अशक्त झाल्याचे गुरव यांनी सांगितले. जाळ्यातून मुक्त केल्यानंतर या  लांडोरीला नैसर्गिक अधिसात सोडून देण्यात आले.या लांडोरीचे प्राण वाचवल्या बद्दल नावाडी नितीन गुरव, पाणीपुरवठा कर्मचारी ललीत कणसे भुवनेश्वरवाडी आणि गणेश खरांडे तासगांव यांच्यावर ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

To Top