संशोधन ही काळाची गरज आहे - मोहन मव्दाणा; चितळे महाविद्यालयात व्याख्यान
संवाद न्यूज भिलवडी प्रतिनिधी:
भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालय व सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने "संशोधनाकडे वळा " या विज्ञानपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक मोहन मद्वाण्णा- निवृत्त प्राध्यापक दयानंद कॉलेज सोलापूर यांनी वरील उद्गार काढले.यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे हे होते.संस्थेचे सचिव मानसिंग हाके, कार्यक्रमाच्या संयोजिका प्राध्यापिका सुरेखा मस्कर , प्राध्यापक डॉक्टर एस.डी.कदम,प्रा. जी. एस साळुंखे, प्रा. जगदाळे उपस्थित होते .
यापुढे बोलताना प्रा. मोहन मद्वाणा म्हणाले की , संशोधन ही अखंड चालणारी प्रक्रिया असून संशोधन करण्यासाठी फार वेगळे काही करावे लागत नाही. संशोधन म्हणजे तर्कशुद्ध विचार करण्याची पद्धत आहे. आणि कोणत्याही गोष्टीवर आपण तर्कशुद्ध विचार केला तर ते संशोधन होते. आपण इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करतो किंवा वेगळे काहीतरी शोधतो त्यालाच संशोधन असे म्हणावे लागेल. पण भारतीय संशोधनामध्ये आता मागे नाही आपल्या संशोधनाचाच वापर इतर देश घ्यायला लागले. अनेक देशांमध्ये संशोधन प्रमुख म्हणून भारतीयच आहेत आणि भारतीयांच्याकडे चांगली संशोधन वृत्ती आहे . त्यामुळे भारतीयांनी संशोधनाकडे वळावे आणि देश समृद्ध करावा असे ते म्हणाले .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक देशपांडे सर म्हणाले की, संशोधन ही त्या त्या काळाची गरज असली तरी प्रगत व आधुनिक काळानुसार संशोधनात वाढ होत चाललेली आहे.हे भारतीयांच्या दृष्टिकोनातून अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. एकेकाळी परकीय देशांकडून आपण सहायता घेऊन वेगवेगळे अवकाश यंत्र पाठवत होतो पण आज भारताकडून मदत घेऊन अनेक देशांनी आपली क्षेपणास्त्रे अवकाश याने पाठवायला सुरुवात केली आहे. संशोधन ही काळाची गरज असली तरी त्या संशोधनामुळे देशाला आर्थिक ,सामाजिक प्रतिष्ठा मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या पातळीवरती संशोधन करावे.
स्वागत व प्रास्ताविक सायन्स विभाग प्रमुखा प्राध्यापिका सौ सुरेखा मस्कर मॅडम यांनी केले.सूत्रसंचालन प्राध्यापिका संपदा सूर्यवंशी मॅडम यांनी केले पाहुण्यांचा परिचय प्राध्यापिका ए.वाय . पाटील मॅडम यांनी करून दिला.तर आभार प्राध्यापिका कु. के. आर. किणीकर मॅडम यांनी मानले. या कार्यक्रमास बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील कला ,विज्ञान विभागातील विद्यार्थी प्राध्यापक, प्राध्यापिका तसेच सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील सायन्सचे विद्यार्थी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.