Sanvad News पूरग्रस्तांना लागेल ती मदत करू- आ. अरुण लाड ; पलूस तालुक्यातील पूरपरिस्थितीचा आढावा

पूरग्रस्तांना लागेल ती मदत करू- आ. अरुण लाड ; पलूस तालुक्यातील पूरपरिस्थितीचा आढावा

 पूरग्रस्तांना लागेल ती मदत करू - आ.अरुण लाड ; पलूस तालुक्यातील पूरपरिस्थितीचा आढावा


संवाद न्यूज भिलवडी प्रतिनिधी: 

राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर पलूस तहसील क्षेत्रातील भिलवडी, माळवाडी,धनगाव आणि आमणापूर या गावांना आ. अरुण लाड यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. 

यावेळी तहसीलदार दीप्ती रिठे यांच्यासोबत त्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेतली व पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांची अडचण समजून घेतली. संबंधित यंत्रणांना योग्य त्या सुविधा तातडीने पुरवण्यासाठी आवश्यक त्या सूचनाही त्यांच्याकडून देण्यात आल्या. क्रांती कारखान्याच्या माध्यमातून पूरग्रस्त लोकांच्या साहित्याची वाहतूक करण्यासाठी वाहनांची सोय करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीला आपण थांबवू शकत नाही, परंतु याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण सक्षम आहोत. क्रांती परिवार आपल्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असे पत्रकारांशी संवाद साधताना आ. अरुण लाड म्हणाले.

To Top