Sanvad News अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यातील शाळांना सुट्टी

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यातील शाळांना सुट्टी

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यातील शाळांना सुट्टी 


सांगली संवाद न्यूज प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर व कोयना धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे वाढणारी कृष्णेची पाणी पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेता सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अशोक काकडे यांनी शाळांना दोन दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.यामध्ये सांगली जिल्ह्यातील मिरज,वाळवा, शिराळा,पलूस या चार तालुक्यासह महानगर पालिका क्षेत्रातील सर्व शासकीय निमशासकीय शाळांचा समावेश आहे.बुधवार दिनांक २० व शुक्रवार दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.शाळेचे मुख्याध्यापक,सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी या कालावधीत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशावरून आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावयाचे आहे. कृष्णा व वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात निर्माण होणाऱ्या पुर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित नागरिकांना शाळेच्या वर्ग खोल्या उपलब्ध करून द्यायच्या आहेत.

To Top