Sanvad News चला किल्ला करूया...छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेऊया..

चला किल्ला करूया...छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेऊया..


चला किल्ला करूया...छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेऊया..



चला किल्ला करूया...छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेऊया.. हा अभिनव उपक्रम पं.विष्णू दिगंबर पलूसकर विदयालय पलूस या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राबविला. चला किल्ला करूया...,छत्रपती शिवाजी महाराजांजचा इतिहास जाणून घेऊया"या ऊपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना किल्ले तयार करण्यास सांगितले होते.दिपावली च्या सुट्टीमध्ये  विदयार्थ्यांनी आपापल्या घरी दगड,विटा,माती आदी साहित्याचा वापर करून किल्ले बनविले.विदयालयातील मोठया संख्येने विदयार्थ्यांनी या ऊपक्रमात सहभाग घेतला.

 छत्रपती शिवाजी महाराजांनी चारी बाजूला चार शाहया असताना जिद्द,चिकाटी,धाडस,साहस या गुणांच्या जोरावर रयतेचे राज्य स्थापन केले होते.या गुणांची शिदोरी प्रत्येकाला जीवनात उपयोगी ठरणारी आहे.या गुणांचा अंगिकार करणेसाठी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला उजाळा देण्यासाठी,त्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी किल्ले तयार केल्याची भावना विदयार्थ्यांनी व्यक्त केली.

सदर किल्यांचे परीक्षण विदयार्थ्यांच्या घरी जाऊन इतिहास शिक्षक  बाळासाहेब चोपडे,अशोक पवार,मिलिंद शिरतोडे,सुनिल पुदाले यांनी केले.विदयालयाचे मुख्याध्यापक टी.जे.करांडे यांचे या उपक्रमास मार्गदर्शन लाभले.संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे साहेब, सचिव शहा साहेब यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.
या उपक्रमाचा व्हिडीओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.


To Top