सौ.वैशाली जाधव यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर..
सांगली.
देवदान बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कुपवाड, ता. मिरज यांच्यातर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार सौ. वैशाली नितेंद्र जाधव जि.प.शाळा बेडग.ता. मिरज यांना जाहीर करण्यात आला आहे.शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकाना हा पुरस्कार देण्यात येतो. वैशाली जाधव यांनी तालुका स्तरीय आणि जिल्हा स्तरीय शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा आणि विज्ञानसाहित्य निर्मीती स्पर्धेत सातत्याने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. त्यांच्या अनेक सामाजिक कामांची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
वैशाली जाधव या महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक परिषद संघटनेचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष नितेंद्र जाधव यांच्या पत्नी आहेत.लवकरच एका कार्यक्रमात त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.