क्षितिजच्या विद्यार्थ्यांनी दिल्या प्रबोधनात्मक दिवाळी शुभेच्छा.
बुरुंगवाडी ता. पलूस येथील क्षितिज प्रायमरी स्कूल व क्षितिज सैनिकी पॅटर्न निवासी विद्यालया मधील विद्यार्थ्यांनी दिवाळी च्या निमित्ताने आकर्षक अशी भेट कार्डे बनविली.या कार्डावर दिवाळी सणाच्या शुभेच्छा बरोबरच समाज प्रबोधनात्मक संदेश लिहून सर्वांना प्रबोधनात्मक दिवाळी शुभेच्छा दिल्या.शाळेने राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शाळेत शिक्षण घेणाऱ्या सातशेवर विद्यार्थ्यांनी स्वतः विविध आकारात आकर्षक अशी भेट कार्डे बनविली.व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान,फटाके मुक्त दिवाळी,मुलीच्या जन्माचे स्वागत अशा विविध विषयांवरील संदेश तसेच चित्रमय माहितीचा समावेश आहे.ही भेटकार्डे टाकाऊ वस्तूपासून बनविण्यात आली.मुलांनी विविध वस्तूपासून आकर्षक व रंगीबेरंगी आकाश कंदील बनविले.या सर्व वस्तूंचेशाळेमध्येप्रदर्शन भरविण्यात आले.सिद्धविनायक शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक/अध्यक्ष सुनिल(बापू)जाधव,कार्यवाह सौ. वनिता जाधव यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.