Sanvad News शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने घेतली मिरज पंचायत समिती गट विकास अधिका-यांची भेट..

शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने घेतली मिरज पंचायत समिती गट विकास अधिका-यांची भेट..

फंडाच्या तफावत रकमेचा आठ दिवसात निर्णय लावणार-गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांची माहिती.

मिरज तालुका शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मिरज तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित असणाऱ्या विविध प्रश्नांवर मिरज पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
                        सन २०१५-२०१६ मध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन कपाती वेळी फंडाच्या रकमेत फरक पडल्यामुळे अनेक शिक्षकांची जादा कपात होऊन गेलेली रक्कम फंड खातेवर जमा दिसत नाही. सदरची रक्कम एक तर फंड खाते वर जमा करा अन्यथा रोखीने शिक्षकांना परत द्या अशा पद्धतीची मागणी शिक्षक संघाच्या वतीने वारंवार पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर पाठपुरावा करून करण्यात आली होती.सदरची रक्कम कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर शिक्षकांना मिळण्यासाठी गट विकास अधिकारी यांनी विशेष लक्ष घालून सदरचा प्रश्न निकाली काढण्याचा निर्णय घेतला असून ज्यादा कपात झालेली फंडाचे रक्कम परत देण्या संदर्भाचा निर्णय आठ दिवसात लावणार अशा पद्धतीचे आश्वासन गट विकास अधिकारी यांनी संघाचा शिष्टमंडळाला दिले.
               यावेळी मिरज तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नावर चर्चा झाली.त्यामध्ये पेन्शनची प्रकरणे तालुका स्तरावरून वेळेत जिल्हा परिषदेला जात नाहीत परिणामी शिक्षक सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना वेळेत पेन्शन व फंडाची रक्कम मिळू शकत नाही.सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची ससेहोलपट न करता पेन्शनची प्रकरणे पूर्ण तपासून जिल्हा परिषदेला वेळेत पाठवण्यात यावीत व सेवा निवृत्ती दिवशीच शिक्षकांना त्याचा लाभ देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. फंडाची प्रकरणे विनाविलंब कोणतेही त्रुटी न ठेवता तालुक्यातून वेळेत जिल्हा परिषदेला पाठवण्यात यावीत, कायमचे व परिविक्षाधीन कालावधीचे प्रस्ताव विनाविलंब जिल्हा परिषदेला पाठविणेत यावेत, वैद्यकीय बिले व पुरवणी बिले तात्काळ मंजूर होऊन सदर शिक्षकांना त्याचा लाभ देण्यात यावा,गंभीर आजारासाठी मागितलेल्या विशेष रजा विनाविलंब मंजूर करून घेऊन गंभीर आजार ग्रस्त शिक्षकांचा थांबविलेला पगार तात्काळ देण्यात यावा,सेवा पुस्तिकेतील वेगवेगळ्या नोंदी वेळीच घालून प्राथमिक शिक्षकांची सेवा पुस्तके तात्काळ अद्यावत करण्यात यावीत अशा विविध प्रलंबित प्रश्नावर सविस्तर चर्चा केली.
 सदरचे प्रश्न तात्काळ निकाली काढा असे आदेश  गट विकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांनी मिरज पंचायत समिती शिक्षण विभागाला दिले आहेत.
       यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी अशोक बांगर, अधिक्षक राजमाने मॅडम,जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी, जिल्हा कोषाध्यक्ष अमोल माने, जिल्हा नेते शंभूराजे उर्फ धैर्यशील पाटील ,तालुका अध्यक्ष बाळू गायकवाड ,कोषाध्यक्ष प्रदीपकुमार मजलेकर, श्रीधर सूर्यवंशी, सी. के. पाटील, संजय कवठेकर, अनिल सत्यांना आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
To Top