खेळातून केवळ मनोरंजनच होत नाही तर उत्तम करियरही होवू शकते. विद्यार्थ्यानी आपल्या आवडीचा खेळ निवडून त्याचा सतत सराव करावा. खेळातील बारकावे शिकून घ्यावेत. खेळातून निघणारी वाट करियर पर्यंत जावून पोहोचते, असे मत राष्ट्रीय तलवारबाजी खेळाडू व राज्य पंच डॉ. आदित्यराज घोरपडे यांनी व्यक्त केले.
आष्टा (ता. वाळवा) येथील लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या के. सी. वग्याणी प्राथमिक मराठी शाळा, बी. के. चौगुले माध्यमिक विद्यालय व लोकमान्य बालवाडी शाळा या तिन्ही शाळांच्या वर्षिक क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन डॉ. घोरपडे यांच्या हस्ते सरस्वती देवीचे पूजन, के. सी. वग्याणी दादांच्या प्रतिमेस पुष्पहार, मैदान पूजन करून व श्रीफळ वाढवून झाले. अध्यक्षस्थानी लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक ऍड. अभिजीत वग्याणी होते. डॉ. घोरपडे म्हणाले, खेळाडूंना शासकीय नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण आहे. खेळाने अनेकांना तहसीलदार, तलाठी, पोलीस, सैनिक, अधिकारी बनवले. अभ्यासाला खेळाची जोड दिली पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याने रोज एक तास मैदानावर खेळलेच पाहिजे. जंकफूड खाणे टाळून पालेभाज्या व कडधान्ये खल्ली पाहिजेत. वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता राखली पाहिजे. शारीरिक तंदुरुस्ती टिकवली पाहिजे.
इस्लामपूरचे राष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक प्रा. प्रमोद कुचिवाले व अभिजीत वग्याणी यांनीही मार्गदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापीका माधुरी पाठक यांनी स्वागत केले. सचिन कोरे यांनी सूत्रसंचालन केले. क्रीडा विभाग प्रमुख सुरेखा पाटील यांनी आभार मानले. यावेळी राष्ट्रीय प्रशिक्षक आशुतोष पाटील, सुहासिनी चौगुले, सुनीता लटपटे, सुनिता सुर्यवंशी यांसह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.