Sanvad News अस्मिता व सुसंस्कृतीचा पाया स्नेहसंमेलन असतो : तहसीलदार मा.ऋषीकेत शेळके

अस्मिता व सुसंस्कृतीचा पाया स्नेहसंमेलन असतो : तहसीलदार मा.ऋषीकेत शेळके

विटा येथे विजयमाला पतंगराव कदम प्रशालेचे स्नेहसंमेलन संपन्न..


          मुलांना स्फूर्ती मिळावी, त्यांचे कलागुण वाढावेत, त्यांच्या अस्मितेची वाढ व्हावी, इतरांबरोबरचा स्नेह, भाईचार वाढीस लागावा म्हणून स्नेहसंमेलन आयोजित केले जाते. सौ. विजयमाला पतंगराव कदम प्रशालेचे स्नेहसंमेलन आदर्श वाटले ,असे विचार खानापूर तालुका तहसीलदार मा. ऋषिकेत शेळके यांनी मांडले.
         ते पुढे म्हणाले,पालकांनी मुलगा मोबाईल वर काय पाहतो हे आवर्जून चेक करण्याचे दिवस आलेले आहेत. मोबाईलचा उपयोग चांगलाच आहे पण तितकाच वाईटही आहे. मोबाईलवरून अभ्यास करता येतो ,नवे ज्ञान संपादन करता येते ,तसेच पब सारखे अविचारी चैनल ही तेथे आहेत.आपला मुलगा काय पाहतोय  हे पालकांनी पाहिलेच पाहिजे .मुलांनो हसा, खेळा त्यासोबत अभ्यासही करा.तुमचे लेखन, वाचन ,खेळ सुधाराच पण थोरामोठ्यांचा सन्मान करायला शिका. आपले आई-वडील,गुरुजन हे श्रेष्ठतम आहेत याची जाणीव ठेवणारा मुलगा भविष्यात मोठा होतो. परिस्थितीचे भान ठेवून जगतो तो खरा ज्ञानी असतो.
       यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती सागर लकडे व सौ.श्रुती लकडे उपस्थित होते .सागर लकडे म्हणाले , व्यक्ती ,समाज आणि राष्ट्र या विद्यार्थ्यांच्यातून घडणार आहेत .स्पर्धा परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्याने कराच पण त्याबरोबर उद्योगात आपले करियर करा. कोणताही उद्योग छोटा किंवा मोठा नसतो .हर एक छोटा उद्योग मेहनतीने ,कष्टाने आणि सावधानतेने मोठा होतो.सौ. विजयमाला कदम प्रशालेचा उत्कर्ष फारच आवडला. शाळा आणखी मोठी होईल.
          यावेळी आदर्श वाचक विद्यार्थी म्हणून सप्तमी अनिल घारे  व  आदर्श विद्यार्थी म्हणून स्नेहल जाधव आदर्श व  शुवम महाडिक यांचा सन्मान करण्यात आला. तसेच आदर्श शिक्षक म्हणून राजू गारोळे व पूजा जाधव व  आसिफ मुजावर  यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार  देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्यवाह योगेश्वर मेटकरी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय रघुराज मेटकरी यांनी करून दिला. सूत्रसंचालन शंकर कांबळे यांनी केले तर आभार तोसिम शिकलगार यांनी मानले.
To Top