Sanvad News सन्मान शिक्षण संकुल माळवाडी मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ संपन्न..

सन्मान शिक्षण संकुल माळवाडी मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन समारंभ संपन्न..


             सन्मान शिक्षण संस्थेच्या आदर्श बालकमंदिर प्राथमिक शाळा माळवाडी व सन्मान पब्लिक स्कूल माळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शन समारंभ पार पडला.या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य क्रीडा मार्गदर्शक सांगली चे मा.श्री.प्रशांत पवार व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती पलूसच्या सभापती सौ. सिमाताई मंगलेकर उपस्थित होत्या. या प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्रे व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.प्रशांत पवार सरांनी खेळासंबधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .पारितोषिक वितरण समारंभानंतर विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रमात विविध नृत्ये सादर केली .या सोहळ्यासाठी सन्मान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.प्रा.संजय यादव ,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सांगलीचे अध्यक्ष मा.बाळासो कटारे ,सन्मान पब्लिक स्कूल माळवाडीच्या मुख्याध्यापिका सौ.सुजाता औताडे, आदर्श बालकमंदिर प्राथमिक शाळा माळवाडीच्या मुख्याध्यापिका सौ.लता पाटील ,सुबराव बापू यादव बालशिक्षण मंदिर माळवाडीच्या प्रमुख सौ.प्रमिला येसुगडे ,सन्मान करिअर (सैनिकी पॅटर्न) निवासी संकुलाचे प्रमुख मा.श्री. प्रशांत जाधव ,तसेच श्री.विकास जंगले, श्री .अर्जुन गेंड, श्री तानाजी माने, श्री रमेश बरीस, ,श्री किरण गायकवाड ,श्री संतोष कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन कु.प्रतीक्षा फार्णे यांनी केले तर आभार सौ.सविता सविता महिंद यांनी मानले.

x
To Top