Sanvad News भिलवडी केंद्रस्तरीय क्रीडा मेळावा उत्साहात संपन्न...

भिलवडी केंद्रस्तरीय क्रीडा मेळावा उत्साहात संपन्न...


जिल्हा परिषद शाळा माळवाडी येथे भिलवडी केंद्राचा केंद्र स्तरीय क्रीडा मेळावा उत्साहात व आनंदात पार पडला.पलूस तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी प्रसाद कालगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व माळवाडी गावचे सरपंच बाळकृष्ण जाधव,उपसरपंच जनार्दन साळुंखे,राष्ट्रीय खेळाडू सौ.आशाताई साळुंखे यांच्या हस्ते शाळेच्या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन झाले. यावेळी केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक पालक विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपस्थित होते.या क्रीडा स्पर्धेसाठी प्रथम सर्व सहभागी शाळांचे एकत्रित संचालन घेण्यात आले. माळवाडी गावातून प्रभात फेरी काढण्यात आली व गावकऱ्यांना क्रीडा स्पर्धेसाठी पाचारण केले.सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा प्रतिज्ञा देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक संपत कदम यांनी केले. प्रमुख पाहुणे माननीय श्री प्रसाद कालगावकर साहेबांनी विद्यार्थ्यांना खेळाविषयी च्या सूचना दिल्या तसेच खिलाडूवृत्तीने खेळण्याचे आवाहन केले.केंद्रस्तरीय स्पर्धेसाठी केंद्र भिलवडीचे केंद्र प्रमुख श्रीअशोक कोळेकर, सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्री धनंजय भोळे,अरुण कोळी,सागर कदम,राजेंद्र कांबळेे,श्री अस्लम महाब्री ,श्री राजेंद्र माळी, संभाजी कांबळे,श्री रोहीत गुरव सौ.सुषमा देशमाने सौ.स्मिता पाटील, सविता सत्याण्णा,सौ. राजश्री मोकाशी,अर्चना माने यांनी स्पर्धा उत्तमरित्या पार पाडल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रोहित गुरव यांनी केले. आभार प्रदर्शन श्री प्रताप मोकाशी यांनी केले.

To Top