५ जानेवारीला मिरज येथे संमेलन; पुस्तक प्रकाशन,
आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण,कविसंमेलन व
उपक्रमशील शिक्षकांचा होणार गौरव..
अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ, शाखा-सांगली यांच्यावतीने पहिले जिल्हास्तरीय साहित्य संमेलन.
रविवार दि 5 जानेवारी 2020 रोजी आय.एम.ए हाँल, पंचायत समितीसमोर,मिरज जि. सांगली येथे संपन्न होत आहे. तरी सदर संमेलनात सांगली जिल्ह्यातील सर्व शिक्षक साहित्यिक,साहित्यरसिक, शिक्षक यांनी सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन या निवेदनाद्वारे करत आहे. तसेच कला व क्रीडा क्षेत्रातील शिक्षकांनीही उपस्थित रहावे.▶️जिल्हास्तरावर मंडळामार्फत वर्षभर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. त्यासंबंधी संकलन यादी मंडळाच्या ग्रुपवर पाठवण्यात आली आहे. कुणाचे नाव नजरचुकीने राहिल्यास चूक निदर्शनास आणून द्यावी.
▶️संमेलनामध्ये होणाऱ्या कविसंमेलनात काव्यवाचनासाठी इच्छुक कवींनी आपली नावे ग्रुपवर द्यावीत.प्रथम 15 नावनोंदणी केलेल्या कवींची यादी निश्चित केली जाईल.
▶️प्रत्येक तालुक्यातून एक जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येईल. त्यासाठी इच्छुक शिक्षकांनी आपले प्रस्ताव दि. 15/12/19 पर्यंत ग्रुपवर अथवा वैयक्तिक भ्रमणध्वनीवर(9421105048-9284772702) पाठवावेत.ज्या शिक्षकांना यापूर्वी कोणत्याही माध्यमातून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत त्यांनी प्रस्ताव पाठवू नयेत.प्राथमिक शिक्षकापासून वरिष्ठ महाविद्यालयापर्यतचे कोणतेही कार्यरत शिक्षक प्रस्ताव पाठवू शकतात. सदर शिक्षक हे साहित्यिक असावेत वा ग्रुप सदस्य असावेत असे बंधन नाही.आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवडल्या जाणाऱ्या शिक्षकांकडून स्वखुशीनेही आर्थिक मदत स्वीकारली जाणार नाही. जिल्हाध्यक्ष व संबंधित तालुकाध्यक्ष हे पुरस्कार निवडीचे निर्णय घेतील. संपर्कध्वनी-9421105048/9284772702
▶️ संमेलनामध्ये ज्यांचे पुस्तक प्रकाशित करायचे असेल त्यांनी दि 14/12/19 पर्यंत तसे ग्रुपवर वा जिल्हाध्यक्षांना कळवावे. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
▶️ संमेलनासाठी कोणतीही वर्गणी आकारली जाणार नाही, तथापि स्वखुशीने मिळणारी आर्थिक मदत स्वीकाहार्य राहील. त्यासाठी
श्री व्यंकटेश जंबगी-कोषाध्यक्ष
भ्रमणध्वनी-9975600887
श्री विजय जंगम-उपाध्यक्ष भ्रमणध्वनी-9970749600 यांच्याशी संपर्क साधावा.तसेच आर्थिक मदत दिलेल्यांच्या नावांची यादीअभाशिसा.क.क्री.मंच सांगली या ग्रुपवर वेळोवेळी अद्ययावत करुन जाहीर करणेत येईल. संमेलनानंतर खर्चाचा तपशीलही याच ग्रुपवर जाहीर करण्यात येईल.
▶️संमेलनासाठी स्वखर्चाने उपस्थित रहायचे असून कोणत्याही प्रकारचे मानधन दिले जाणार नाही.
▶️संमेलनाबाबत सविस्तर तपशील-कार्यक्रमपत्रिका लवकरच ग्रुपवर जाहीर केला जाईल.
जिल्हाध्यक्ष तथा संमेलनाध्यक्ष
श्री सचिन कुसनाळे संपर्कध्वनी-9421105048/9284772702