Sanvad News पक्षीमित्र संदीप नाझरे यांचा आमणापूर शाळेतील बच्चेकंपनीशी संवाद.

पक्षीमित्र संदीप नाझरे यांचा आमणापूर शाळेतील बच्चेकंपनीशी संवाद.


             आज जिल्हा परिषद शाळा आमणापूर ता. पलूस येथे पक्षीमित्र संदीप नाझरे यांनी भेट देवून इयत्ता सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांशी दिखुलास संवाद साधला.संदीप नाझरे हे मुक्त पत्रकार असून इयत्ता सहावीच्या बालभारती पाठयपुस्तकातील "पण थोडा उशीर झाला" या पाठाचे लेखक आहेत.
           शाळेतील बच्चेकंपनीना त्यांनी कृष्णाकाठच्या विविध पक्षांबाबत सचित्र माहिती दिली. खंड्या, धोबी पक्षी, ढोकरी बगळा, ताम्रमुखी, टीटवी, करडा बगळा, पांढरा बगळा, वल्हा ब्लॅक आयबीस हे स्थानिक पक्षी.प्रवासी पक्षी हळदीकुंकू बदक, शेकाट्या, चमच्या, पांढऱ्या मानेचा बगळा, उघड्या चोचीचा करकोचा,रंगीत करकोचा.
स्थलांतरित पक्षी पिवळा धोबी,पांढरा धोबी, चिखल्या, गुल, सॅन्ड पाईपर.असे विविध प्रकारचे पाणपक्षी सध्या आमणापूर येथील कृष्णा नदी परिसरात पाहावयास मिळतात. यातील स्थलांतरित पक्षी बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, हिमालय पर्वत येथून हजारो मैल प्रवास करत येथे पोहचले आहेत.अन्नाच्या शोधात व स्वतःचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने हे पक्षी स्थलांतर करत असल्याचे त्यांनी सांगितले.नाझरे यांनी विविध पक्षांची माहिती सांगून त्यांचे फोटोग्राफ व व्हिडीओ दाखवले.विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली.
                    सुरेश खारकांडे यांच्या हस्ते संदिप नाझरे यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे संयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता मोकाशी,कविता कांबळे,मनिषा रावळ,ज्योती पाटील,सुनिता करपे,सारीका गंभीर,असिफा नदाफ, सुरेश खारकांडे आदी शिक्षकवृंदानी केले.
To Top