Sanvad News अभिनव बालक मंदिर सांगली येथे क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ..

अभिनव बालक मंदिर सांगली येथे क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ..

        
           
         स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान संचालित अभिनव बालक मंदिर सांगली शाळेच्या क्रीडा स्पर्धांचे उदघाट्न उत्साहात  संपन्न झाले. स्पर्धांचे  उदघाट्न अंतरराष्ट्रीय टेनिस,व्हॉलीबॉल खेळाडू कु अनुष्का पुजारी,प्राची कडणे आणि साक्षी भुर्के या तीन खेळाडूंच्या हस्ते झाले. 
           कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडाविभाग प्रमुख श्री नितेंद्र जाधव सर यांनी केले. शाळेत घेण्यात येणाऱ्या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये खेळाचे संस्कार घडतात.शारीरिक विकास होतो. मन प्रसन्न होते आणि यातुनच भावी आदर्श खेळाडू बनतात असे सांगितले यावेळी महेश जोशी सरांनी विद्यार्थ्यां ना क्रीडा प्रतिज्ञा दिली.कार्यक्रमाच्या प्रमुख  पाहुण्या कु.प्राची कडणे म्हणाल्या आम्ही भारताला टेनिस व्हॉलीबॉल चे सुवर्ण पदक मिळवून दिले यासाठी आम्ही प्रचंड कष्ट घेतले. कोणतेही यश मिळवताना प्रचंड कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे. एक चांगला खेळाडू बनण्यासाठी नम्रता कष्ट आणि चिकाटी महत्वाची आहे. त्यानंतर क्रीडांगणाचे पूजन करण्यात आले.  
          यावेळी संस्थेचे पदाधिकारी आणि सर्व शिक्षक वृंद हजर होते.उदघाटना नंतर कबड्डीचा एक प्रेक्षणीय सामना झाला. आणि क्रीडा स्पर्धाना सुरुवात झाली.
To Top