Sanvad News शिक्षकांचा आधारवड..माजी आमदार माननीय शिवाजीराव पाटील (आण्णा)

शिक्षकांचा आधारवड..माजी आमदार माननीय शिवाजीराव पाटील (आण्णा)

              

     माजी आमदार माननीय शिवाजीराव पाटील (आण्णा) म्हणजे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील तमाम प्राथमिक शिक्षकांचे आराध्यदैवत म्हणावे लागेल... जणू कार्याचा महामेरूच ! 

       जुन्या काळात शिक्षकांना खूपच पगार कमी होता एवढेच नव्हे तर त्याकाळी कारखान्यातील कामगारांना पगार जास्त होता म्हणून बरेच जण शिक्षकांची नोकरी सोडून कारखान्यात कामावर गेले. त्याकाळी शिक्षकांना पेन्शन नव्हती, अशावेळी हा क्रांतिकारक नेता उदयास आला पेन्शन साठी आंदोलन उभ केलं आणि पहिला प्रश्न पेन्शनचा पार पाडला.
         या लढवय्या नेत्याने चांद्यापासून बांद्यापर्यंत शिक्षक बांधव एकत्र केले आणि लढा दिला मनगटातील ताकद दाखवली . नेत्याच्या डोक्यात काय आहे यापेक्षा त्याच्या मागे डोकी किती आहेत हे महत्त्वाचे असते असे ते नेहमी म्हणत. या देशात शक्तीची पूजा केली जाते , शिक्षकांची ताकद खूप मोठी आहे .आपली शक्ती ,आपली ताकद दाखविल्याशिवाय आपल्याला काहीही मिळत नाही हे त्यांनी अनेक अधिवेशनाच्या माध्यमातून दोन दोन ,तीन तीन लाख शिक्षक  जमा करून दाखवून दिले.
    बडकस आयोगापासून सातव्या आयोगापर्यंत शिक्षकांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी हा शिक्षक नेता चंदनाप्रमाणे  झिजला
शिक्षकांच्या  अनेक अधिवेशनात  त्यांनी लाखोंची उपस्थिती दाखवून दिली. दिल्ली,रत्नागिरी, गोवा ,ओरस ही अधिवेशने तर खूपच गाजली प्रत्येक अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह शिक्षण मंत्रीच नव्हे तर सगळं मंत्रिमंडळ  आणण्यात या जादूगाराची किमया होती. असा शिक्षक नेता इतिहासात झाला नाही आणि यापुढे होणार नाही.
   अण्णांच्या एका हाके खाली तर साऱ्या महाराष्ट्रातून लाखो शिक्षक मुंबईच्या आझाद मैदानात हजर व्हायचे. त्यांच्या एका हाकेतील  जादूची किमया पाहून शासनाने त्यांच्या मागण्या कधीच फेटाळल्या नाहीत .शासनाला त्यांच्या मागण्या मान्य करण्याखेरीज गत्यंतर नसायचे. कारण शासन उलथवून टाकण्याची हिम्मत फक्त आण्णा मध्ये आणि अण्णा मध्येच होती.स्वर्गीय वसंतदादांना सुद्धा अण्णांच्या मागण्या मान्य करण्याशिवाय पर्याय नसायचा.
           शाळेसाठी खर्चाला पैसे नसायचे आणि त्यासाठी  लढा देऊन त्यांनी शाळांना सादील मिळवून दिला.महाराष्ट्राचे नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनीदेखील अण्णांची ताकद ओळखली आणि त्यांना आमदार केले परंतु तेथेही अण्णा गप्प बसले नाहीत त्यांनी शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी आपल्या शासनाविरुद्ध आवाज उठवला सिंहगर्जना केली , शिक्षकांचे प्रश्न शासाना बरोबर चर्चेने,चर्चेने सुटत नसतील तर विरोधात जाऊन,तरीही सोडवले नाहीत तर प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करून प्रश्न सोडवण्याची ताकद फक्त शि. द.आण्णा मध्येच होती.
        आण्णांच्या कार्याची किती गावी थोरवी पेन्शन नियम शासन मान्य केला,वीस मैल बदलीचा नियम हटवला, शिक्षकी मुलास फी मुक्त केले,घरभाडे भत्ता वाढविला ,मुख्याध्यापक पदोन्नती मिळविली, 50 पैसे सदील चार टक्के केला,तीनशे पगार पूर्ण वेतनावर आणला, राष्ट्र व राज्य पुरस्कार शिक्षकांना वेतनवाढी मिळवून दिल्या,घरभाडे भत्ता, वर्षाला वेतनवाढ ,पती-पत्नी एकत्रीकरण ,आदिवासी भागातील शिक्षकांना जादा वेतन, चटोपाध्याय त्रिस्तरीय वेतनश्रेणी,वरिष्ठ वेतन श्रेणी ,एक शिक्षकी शाळा द्विशिक्षकी केल्या ,वस्तीशाळा शिक्षकांचा पगार वाढविला असे एक ना अनेक प्रश्न त्यांनी सोडविले. सध्या बंद झालेली जुनी पेन्शन पुन्हा मिळवून देण्यासाठी ते आग्रही होते.
       शिक्षकांसाठी झटणाऱ्या ,आपले सारे आयुष्य केवळ शिक्षकांसाठी , शिक्षकांच्या प्रश्नासाठी , शिक्षकांच्या स्थैर्यासाठी वेचणाऱ्या या देवदूताला,शिक्षक दुताला  कितीही उपमा दिल्या तर त्या थोड्याच होणार्‍या आहेत त्यांच्या कार्याला महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधु - भगिनी कडून सलाम.आदरणीय शि.द.आण्णांचे नुकतेच निधन झाले.त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्या पवित्र स्मृतीस ईश्वरचरणी भावपूर्ण आदरांजली..
           अमोल माने,
       जिल्हा सरचिटणीस,
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सांगली.9890170840
To Top