Sanvad News पं.विष्णू दिगंबर पलूसकर च्या विद्यार्थ्यांची बँक व पोस्ट ऑफिस ला भेट.

पं.विष्णू दिगंबर पलूसकर च्या विद्यार्थ्यांची बँक व पोस्ट ऑफिस ला भेट.

पं.विष्णू दिगंबर पलुस्कर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बँक व पोस्ट ऑफिस ला भेट देऊन तेथील कामकाज जाणून घेतले .पलूस पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर मा. गायकवाड साहेब यांनी विद्यार्थ्यांना सर्व माहिती दिली .तसेच पलूस शहरातील पलूस सहकारी बँकेस विद्यार्थ्यांनी भेट देऊन कामकाजाविषयी माहिती घेतली .पलूस सहकारी बँकेचे चेअरमन मा.वैभव राव पुदाले साहेब तसेच शाखाधिकारी जाधव साहेब यांची भेट घेऊन बँके विषयी माहिती घेतली.हिंदी विषयातील पोस्ट ऑफीस व बँकेला भेट या ऊपक्रमांतर्गत हिंदीचे शिक्षक श्री बाळासाहेब चोपडे सर यांनी या भेटीचे आयोजन केले होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. टी.जे करांडे सर यांचे मार्गदर्शन लाभले. या उपक्रमाचे कौतूक संस्थेचे अध्यक्ष माननीय उदय परांजपे साहेब यांनी केले.

To Top