सौ.विजयमाला पतंगराव कदम प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न..
यानंतर प्रमुख पाहुण्या प्रा.चंदना लोखंडे मॅडम म्हणाल्या की,
निसर्गाने प्रत्येक मुलात आणि मुलीत अलौकिक नैसर्गिक शक्ती दिली आहे.या शाळेत त्या शक्तीचा योग्य वापर शिकवला जातो आहे. कलागुण जोपासणे ही ज्ञानाची वरची पातळी आहे. शाळा,शिक्षक आणि पालक विद्यार्थ्यांची ज्ञानकेंद्र आहेत. शाळा आणि पालक यांच्या संयुक्त सहयोगाने मुले घडत असतात. सौ.विजयमाला पतंगराव कदम प्रशाला विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा, शौर्य, कृतज्ञता, बुद्धी, तत्वनिष्ठा, चारित्र्य व जीवमात्रांवर प्रेम करायला शिकविणारी शाळा आहे. इथली प्रत्येक मुलगी विद्या, धैर्य आणि अभ्यासात सुंदर प्रगती साधते आहे.इथली प्रत्येक मुलगी तेजस्विनी बनेल ,असे विचार प्रा.लोखंडे यांनी मांडले.
प्रथम डॉ. अनिल लोखंडे, डॉ. आदिनाथ रुपनवर , डॉ.अर्चना लोखंडे व सौ.दिपाली रुपनवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. चंदना लोखंडे व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ' वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले.
यासोबतच प्रशालेच्या प्राचार्या वैशाली कोळेकर यांना यंदाचा ' आदर्श शिक्षक ' पुरस्कार व सागर वाघमारे यांना ' उत्कृष्ट कार्याबद्दल आदर्श पुरस्कार 'देवून गौरवण्यात आले. यासोबतच संचीता रुपनर ,सानिया मुल्ला व सानिका महाडिक या विद्यार्थिनींना यंदाचा ' आदर्श वाचक विद्यार्थी ' पुरस्काराने गौरविण्यात आले.
संस्थापक व साहित्यिक रघुराज मेटकरी , प्राचार्या वैशाली कोळेकर यांनीही यावेळी मनोगते व्यक्त केली .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे कार्यवाह योगेश्वर मेटकरी यांनी केले .तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर कांबळे व पूजा जाधव यांनी केले . आभार राजू गारोळे यांनी मानले यावेळी मोठ्या संख्येने पालक व कलारसिक उपस्थित होते.