गुरुजनहो संवेदनशील मनाने विद्यार्थी घडवा:-गटशिक्षणाधिकारी प्रसाद कालगावकर
जिल्हा शैक्षणिक सातत्ययपूर्ण व्यावसायिक विकास संस्था सांगली यांच्या वतीने आयोजित वर्ग अध्ययन-अध्यापन व मूल्यमापनाच्यावेळी आव्हानात्मक संकल्पना बाबत अध्यापन तंत्र पद्धती विकसन प्रशिक्षण शिबीरास कुंडल ता. पलूस येथील वन विभागाच्या प्रशिक्षण केंद्रात सुरू झाले.
पलूस पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रसाद कालगावकर यांच्या हस्ते या प्रशिक्षण शिबिराचे दीपप्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले.२३ ते २७ डिसेंबर या पाच दिवसाच्या कालावधीत संपन्न होणाऱ्या शिबिरात पलूस,तासगाव, वाळवा,कडेगाव या तालुक्यातील माध्यमिक व खाजगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक सहभागी झाले.
प्रशिक्षणाच्या माध्यमातून मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग करून शिक्षकांनी आपल्या क्षमता वाढवाव्यात व त्याचा उपयोग विद्यार्थ्यांमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी करावा.मुलं आई वडीलानंतर ज्याच्यावर प्रेम करतात ती व्यक्ती म्हणजे शिक्षक होय.संवेदनशील मनाने विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी घ्या.दिव्यांग विद्यार्थ्याना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यामध्ये योग्य तो बदल घडवून आणा असे आवाहन गटशिक्षणाधिकारी प्रसाद कालगावकर यांनी केले.
सौ.उषा सातपुते,राहुल कुंभार,नंदकुमार मासाळ, संतोष सिसाळ या तज्ञांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.
सागर कदम, विनोद आल्हाट,सुनिल बन्ने,भारती लुगडे,अमोल कोळेकर,पौर्णिमा आकळे, शुभांगी रुईकर,रुपाली राजमाने यांनी शिबिराचे संयोजन केले.
सागर कदम, विनोद आल्हाट,सुनिल बन्ने,भारती लुगडे,अमोल कोळेकर,पौर्णिमा आकळे, शुभांगी रुईकर,रुपाली राजमाने यांनी शिबिराचे संयोजन केले.