
वैजापूर येथील जे के जाधव कला, वाणिज्य, महाविद्यालयामार्फत दिला जाणारा कादंबरी विभागाला राज्य पुरस्कार रवी राजमाने लिखित 'वाळवाण'ला जाहीर झाला आहे.रोख रक्कम पाच हजार व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.दि २४ डिसेंबर रोजी प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील ,प्रभाकर बागले वासुदेव मुलाटे या मान्यवरांच्या हस्ते औरंगाबाद येथे प्रदान करण्यात येणार आहे .रवी राजमाने हे येळावी ता. तासगाव चे सुपुत्र असून ब्राम्हनंद विद्यालय ब्रह्मनंदनगर येथे माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्यांचे वास्तव व शेतकर्यांचे प्रश्न या कादंबरीने वाचकांसमोर आणलेले आहेत. महाराष्ट्रातील बहुतांश साहित्य संघाचे या वर्षीचे पुरस्कार वाळवाण ने मिळविलेले आहेत.
प्रसिद्ध चित्रकार अन्वर हुसैन यांनी रेखाटलेले मुखपृष्ठ व साकेत प्रकाशनाची दर्जेदार निर्मिती या या कादंबरीच्या जमेच्या बाजू आहेत.वाळवाण च्या या यशाबद्दल लेखक रवी राजमाने यांचे साहित्यिक सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे .