अंकलखोप ता. पलूस सौ.आशाताई विलासराव पाटील इंग्रजी माध्यम स्कूल येथे राष्ट्रीय गणित दिवस व राष्ट्रीय किसान दिवस हे साजरे करण्यात आला. प्रगतशील शेतकरी अद्वैत कोरे व गणित शिक्षक स्वप्नाली बसुगडे प्रमुख पाहुणे पदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शेतीविषयी व गणित विषया विषयी माहीती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी व शिक्षक वर्ग मिळून शेती करण्याच्या उद्देशाने शाळेच्या आवारात शेतीकाम सुरु केले. शेतीचे व शेतीतून मिळणाऱ्या विविध पिकांची माहिती देऊन वास्तवात शेतीचा प्रयोग करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेनुसार गणित दिवस व शेतकरी दिवस विषयी भाषणे केली. तसेच गणित शिक्षक सुप्रिया राढे यांनी गणित तज्ञ श्रीनिवास रामानूजन यांच्या कार्याची माहिती दिली. शाळेचे संस्थापक श्री अभिजित पाटील यांची प्रेरणा, मुख्याध्यापक जयवंत कदम यांचे मार्गदर्शन मिळाले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी शेतकरी वेशभूषेत आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती हजारे यांनी तर आभार निता कार्वेकर यांनी मानले.