Sanvad News आमणापूर केंद्रातील क्रीडा स्पर्धा उत्साहात.

आमणापूर केंद्रातील क्रीडा स्पर्धा उत्साहात.


      आमणापूर ता. पलूस येथे केंद्रशाळा स्तरावरील क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. धनगाव बोरजाईनगर सांडगेवाडी विठ्ठलवाडी आमणापूर कृषीनगर शेरीमळा अनुगडेवाडी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारात उज्वल यश संपादन केले.
स्पर्धेचे उदघाटन युवा नेते वैभव उगळे सरपंच विश्वनाथ सुर्यवंशी अण्णासाहेब पाटील मोहन घाडगे सर्व ग्रा.पं. सदस्य, शाळा व्यवस्थापन कमिटी सदस्य केंद्र प्रमुख संजय डोंगरे मुख्याध्यापिका सुनिता मोकाशी यांच्या उपस्थितीत झाले.
तर बक्षीस वितरण अण्णासाहेब कोरे अभिजित उगळे उपसरपंच अशोक काटे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
क्रीडा प्रमुख मोहन निकम संदीप कांबळे प्रदीप मोकाशी यांनी उत्कृष्ट संयोजन केले. सामना पंच म्हणून धर्मेंद्र चांदणे शंकर टकले विजय धेंडे यांनी काम पाहिले. या वेळी केंद्र शाळेतील सर्व शिक्षक उपस्थितीत होते.
To Top