Sanvad News अभिनव बालक मंदिर सांगली येथे शेतकरी दिन साजरा..

अभिनव बालक मंदिर सांगली येथे शेतकरी दिन साजरा..


    

        अभिनव बालक मंदिर सांगली येथे शेतकरी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नालंदा अकॅडमी विश्रामबाग आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ कृष्णा व्हॅली यांच्या सदस्यांनी अतिशय नाविन्यपूर्ण हा दिवस शाळेत साजरा केला.
           नालंदा अकॅडमीचे अध्यक्ष अनिकेत साळुंखे यांनी शेतकरी आणि त्याच्या कष्टाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्याच बरोबर झाडे लावून त्यांचे संवर्धन करणे आणि पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे हे समजावून सांगितले.
यावेळी शेतकरी दिना निमित्त सर्व सदस्यांनी मुलांना कुंड्या आणि बियांचे वाटप केले आणि बियां कुंडीत कशा लावायच्या याचे प्रात्यक्षिक दाखविले. आणि रोपटे लावून त्यांची निगा राखण्याची प्रतिज्ञा दिली.
यावेळी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. कुंभार सर सर्व शिक्षक, रोटरॅक्ट क्लब चे अनिकेत साळुंखे, सारंग कट्टी, आसावरी कुलकर्णी, सिद्धी गोडबोले हे सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन नितेंद्र जाधव सरानी केले.

To Top