सांगली जिल्हयातीत खाजगी प्राथमिक शाळेच्या थकित बिलांचा प्रश्न सुटणार:-बाळासाहेब कटारे यांची माहिती.
महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक परिषद सांगली या संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कटारे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शक चंद्रकांत चव्हाण दादा यांच्या अध्यक्षतेखाली उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे शिक्षण उपसंचालक सत्यवान सोनवने साहेब व निरिक्षक डी.एस. पोवारसाहेब यांच्यासमवेत प्रलंबीत थकित वेतन, थकित फरक बीले, यासंदर्भात सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली.
थकितबिला संदर्भात काही बिलांना ऑब्जेक्शन लावण्यात आलेले असून ती बिले परत सांगली प्राथमिक पे युनिटकडे दोन दिवसात पाठवण्यात येणार आहेत. उर्वरीत बिले पुणे कार्यालयाकडे मंजूरीसाठी पाठवण्यात येणार आहे.सांगली जिल्हयातील सर्व शिक्षकांना विनंती वजा सूचना करतो की ,आपले कोणतेही बिल असू दे आपणास दिलेल्या सूची प्रमाणे सर्व कागदपत्रासह बिल तयार करून पे युनिट येथे सादर करावे व पोहच घ्यावी त्यामुळे आपण सादर केलेले बील हे सर्व कागदपत्रासह परिपुर्ण होते हे सिद्ध होईल.
आतापर्यंत ज्यांची बीले डीवायडी कोल्हापूर येथे गेली आहेत त्यांची बीले त्याचऑफीसला गेली ७ महिने अडकून आहेत. त्याचा पाठपुरावा पुन्हा एकदा शिक्षक परिषद करत आहे.
आपले हक्काचे पैसे शासनाकडे विनाकारण ठेवत आहे. बँकांची कर्जे काढायची आणी त्यांचे व्याजापोटी मोठी रक्कम भरायची का? असे करत बसलो तर कष्टाचे पैस्याचा आपणास लाभ घेता येणार नाही.७ महिने झाले उपसंचालक कार्यालयात मुद्दाम बीले अडकवून ठेवण्यात आली आहेत.सांगली प्राथमिक पे युनिटमध्येही चार ते पाच महिने शिक्षकांची बिले स्वीकारून ठेवली आहेत परंतु ती अजून उपसंचालक कार्यालयास पाठवण्यात आली नाहीत.
खाजगी प्राथमिक शाळांसाठी स्वतंत्र पे युनिट असताना मोजक्या शाळा, शिक्षक यांची कामे वेळेत होत नाहीत यावर शिक्षक परिषदेने दिवसभर आढावा घेतला आहे . बीले वेळेत पाठवावी अशी विनंती करण्यात आली आहे.
यावेळी शिक्षक परिषदेचे मा. राजाराम व्हनखंडे सर, मा. उदयसिंह भोसले सर, मा.नितेंद्र जाधव सर, मा. संतोष जाधव सर, मा.बाळासाहेब बुरुटे सर, मा. अनिल उमराणी सर, विजय काटकर सर, मा. प्रविण खोत सर, मा.विजयालक्ष्मी नलवडे मॅडम, मा. भारत भडकेसर यांच्यासह मोठया संख्येने सदस्य उपस्थित होते.