Sanvad News विद्यार्थी मित्रांनो टी.व्ही.मोबाईलशी नको पुस्तकांशी मैत्री करा:- कथाकथनकार अर्चना लाड यांचे आवाहन

विद्यार्थी मित्रांनो टी.व्ही.मोबाईलशी नको पुस्तकांशी मैत्री करा:- कथाकथनकार अर्चना लाड यांचे आवाहन


भिलवडी येथील खाजगी मराठी प्राथमिक शाळेत वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ..

भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.ग्रामीण कथाकथनकार सौ.अर्चना लाड यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये व भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त जे. बी. चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.
                   विद्यार्थी दशेपासून तुम्ही नम्रतेने वागायला शिकला तर भविष्यात यशस्वी व्हाल.टी.व्ही.मोबाईलच्या वापरावर नियंत्रण आणून पुस्तकांशी मैत्री करा,वाचनाच्या माध्यमातून चांगले संस्कार घडतील असे आवाहन सौ.अर्चना लाड यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जे.बी. चौगुले म्हणाले की,पालकांनी मुलांमध्ये असणाऱ्या उणिवा शोधून तो सर्वगुणसंपन्न कसा होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते विविध परीक्षा,बाह्यस्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते बालकुंज हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.



                यावेळी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक डी. के. किणीकर,संजय कदम,जयंत केळकर,बापूसाहेब पाटील,प्राथमिक विभागप्रमुख प्रा.सौ.मनिषा पाटील,बाबासाहेब चितळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.बी.चव्हाण,सेकंडरी स्कूल भिलवडीचे मराठी भाषा विभाग प्रमुख संजय मोरे,इंग्लिश मिडीयम विभाग प्रमुख के.डी.पाटील,चितळे डेअरीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सी.व्ही.कुलकर्णी आदी मान्यवरांच्यासह विद्यार्थी,पालक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
                     प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी केले.पाहुण्यांचा परिचय शरद जाधव यांनी केला.सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले,अहवाल वाचन संध्याराणी भिंगारदिवे यांनी,पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे निवेदन सौ.प्रगती भोसले,पूजा मोरे यांनी केले. बालकुंज या हस्तलिखिता बाबत वर्षा काटे यांनी माहिती सांगितली. तर आभार विठ्ठल खुटाण यांनी मानले.

अर्चना लाड यांच्या कथाकथनात मंत्रमुग्ध झाले विद्यार्थी...




To Top