Sanvad News भिलवडीच्या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये अवतरला सांताक्लॉज..

भिलवडीच्या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये अवतरला सांताक्लॉज..


             शाळेने आयोजित केलेल्या ख्रिसमस पार्टीत बच्चेकंपनीचा आवडता सांताक्लॉज अवतरला.त्याने आपल्या पोथडीत हात घातला..नि चक्क खाऊचे वाटप केले.हा सारा प्रकार मुलांच्यासाठी स्वप्नवत असा होता.
           भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मिडियम स्कूल, भिलवडी मध्ये नुकतेच ख्रिसमस पार्टी चे आयोजन करण्यात आले.यानिमित्त शाळेत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मुक्त असे व्यासपीठ देण्यात आले. सिनीयर के.जी.च्या मुलांनी सांताकलाँज चे व ज्युनियर के.जी च्या मुलांनी ख्रिसमस ट्री च्या चित्रांत रंगभरण केले.
               मुलांच्या भेटीसाठी आलेल्या सांताकलाँजने मुलांचे मनोरंजन केलेच पण भेटवस्तूबरोबर खाऊचे ही वाटप केले.शिक्षकांनी मुलांना नाताळ या सणा विषयी माहिती दिली.परस्परांना ख्रिसमस नाताळच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.मुलांना शाळेकडून अल्पोपहार देण्यात आला. सर्वांनी या कार्यक्रमाचा भरभरून आनंद लुटला.


To Top