Sanvad News जीवन सुंदर बनवायचे असेल तर लेकरांच्या पंखात बळ निर्माण करा-डॉ. इंद्रजीत देशमुख

जीवन सुंदर बनवायचे असेल तर लेकरांच्या पंखात बळ निर्माण करा-डॉ. इंद्रजीत देशमुख

पंडीत विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्थेचे स्नेहसंमेलन उत्साहात...


जीवन सुंदर बनवायचे असेल तर लेकरांच्या पंखात बळ निर्माण करा असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते डॉ. इंद्रजीत देशमुख यांनी केले.पंडीत विष्णू दिगंबर पलूसकर शिक्षण संस्थेच्या वार्षिक  स्नेहसंमेलना निमित्त आयोजित
कार्यक्रमात ते बोलत होते.
यापुढे बोलताना डॉ. इंद्रजीत देशमुख म्हणाले की, मुलांना     मोठ्यांचा आदर व लहानांची कदर करायला शिकवले पाहिजे.मुले निरागस असतात,आपण जे बोलतो तेच मुलांचा मध्ये उतरते. आपली सर्वश्रेष्ठ संपत्ती मुले हीच आहे. आपल्या लेकरातला राजहंस ओळखा. सुखदुःखाच्या गोष्टी मुलांशी चर्चा  करा. लाख मोलाची दौलत आपल्या हातात परमेश्वराने दिली आहे.त्यांना चांगले संस्कार देवूया.
       आपल्या मनोगतात संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे यांनी वर्षभरातील कला,क्रीडा ,व सांस्कृतिक यशाचा आढावा घेतला व संस्थेच्या भावी योजनांची माहिती दिली.
        संस्थाभूषण पुरस्कारप्राप्त सौ.ए.ए.कुलकर्णी,सौ.टी.पी. पाटील मॅडम,आदर्श विद्यार्थी, गुणवंत खेळाडूंचा  मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला भरारी हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.
              यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुनिल रावळ,सचिव जयंतीलाल शहा ,संचालक विश्वास रावळ,संजय परांजपे,सुभाष सदामते ,सौ.वर्षाभाभी शहा  मुख्याध्यापक टी.जे करांडे,माजी प्राचार्य डॉ.बी.एन. पवार, सुभाष कवडे, एस ए. पाटील, डॉ. चंद्रकांत पवार,आनंदराव पुदाले, मधुकर जाधव ,मोहन सुतार, पलूस परिसरातील सर्व मान्यवर , शिक्षक, विद्यार्थी,पालक  उपस्थित होते. 
          पाहुणे परिचय प्रा.बी.एन.पोतदार,
 सुञसंचालन सौ.सायली मेरु,आभार बी.डी. चोपडे यांनी मानले.संयोजन सांस्कृतिक विभागप्रमुख ए,के.बामणे,ए.जे.सावंत,अलका बागल ,सुधीर कुलकर्णी सर्व  शिक्षक शिक्षकांनी केले.यावेळी विविध सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर,पालक,बहुसंख्येने उपस्थित होते.

To Top