Sanvad News भिलवडीतील विद्यार्थ्यांनी घेतला सूर्यग्रहणाचा शास्त्रोक्त पद्धतीने आनंद..

भिलवडीतील विद्यार्थ्यांनी घेतला सूर्यग्रहणाचा शास्त्रोक्त पद्धतीने आनंद..


        सेकंडरी स्कूल अॕण्ड ज्युनि.काॕलेज भिलवडी मधील सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सूर्यग्रहणाचा वेगळ्या पद्धतीने आनंद लूटला. विद्यार्थ्यांना सूर्यग्रहणासंबंधीचे शास्त्रोक्त ज्ञान ,ग्रहण पाहताना घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती एम.एस.पुजारी व सौ.आर.झेड.तांबोळी यांनी दिली. सूर्यग्रहण पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना जवळपास 300 सौरचष्मे उपलब्ध करुन दिले. यासाठी एन.एन.कुडाळकर यांचे योगदान मिळाले. ग्रहणादिवशी सर्व विद्यार्थी एकत्रित मैदानावर येवून प्रत्यक्ष ग्रहणाचे निरीक्षण केले. ग्रहणाचे निरीक्षण करणेसाठी पीन होल कॕमेराचा वापर केला गेला. प्रा. जी.बी.पाटील यांनी ग्रहणाचे थेट प्रक्षेपण दाखविले. ग्रहण कसे पहावे याबाबत आर.झेड,तांबोळी यांनी माहिती दिली.
            सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी ग्रहण काळात भोजन करुन त्यातील अंधश्रध्दा दूर केली. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका सौ एस.एम.मन्वाचार , उपमुख्याध्यापक एस.एन.कुलकर्णी, पर्यवेक्षक एस.एल.माने यांचे मार्गदर्शन लाभले.
To Top