Sanvad News जगण्याची खरी प्रेरणा कवितेतून मिळते-कवयित्री सौ.मनिषा पाटील; सेकंडरी स्कूल भिलवडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न.

जगण्याची खरी प्रेरणा कवितेतून मिळते-कवयित्री सौ.मनिषा पाटील; सेकंडरी स्कूल भिलवडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न.

         भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेज मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवयित्री सौ. मनिषा पाटील या होत्या.जीवनाचा आनंद कवितेतून व्यक्त करता येतो. जगण्याची प्रेरणा यातूनच मिळत असते. असे विचार त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. एस. एम मन्वाचार यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ. एम. बी पाटील यांनी करून दिला. शाळेच्या वार्षिक अहवालाचे वाचन पर्यवेक्षक श्री. संभाजी माने यांनी केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या संकल्पनेवर आधारित व स्वलेखनातून साकारलेले उपासना या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. उपासना हस्तलिखीताचे संपादकीय मनोगत सौ.आर.सी.यादव यांनी केले.यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेकडील रोख रक्कम, सन्मानचिन्ह व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. याचे निवेदन राजीव आरते यांनी केले. यावेळी संस्थेचे विश्वस्त नानासाहेब चितळे उपस्थित होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे विश्वस्त  जे. बी चौगुले होते. या कार्यक्रमाला संचालक गिरीश चितळे ,डी. के किणीकर, व्यंकोजी जाधव, उपमुख्याध्यापक एस. एन कुलकर्णी, एस. बी चव्हाण, सुकुमार किणीकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक,विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के. डी. पाटील यांनी केले तर आभार जी. एस साळुंखे यांनी मानले.

To Top