Sanvad News विज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्याच्या संशोधक वृत्तीला चालना देणारा असावा;- सभापती सिमाताई मांगलेकर

विज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्याच्या संशोधक वृत्तीला चालना देणारा असावा;- सभापती सिमाताई मांगलेकर

 छ.शिवाजी विद्यालय दुधोंडी येथे पलूस तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन.


       विज्ञानातुन संशोधक वृत्ती वाढली पाहिजे.त्या संशोधनातुन मानव जातीचे जास्तीत जास्त कल्याण झाले पाहिजे असे मनोगत पलुस पंचायत समितीच्या  सभापती साै.सिमाताई मांगलेकर यांनी केले.
     छ.शिवाजी विद्यालय दुधोंडी येथे ४५ व्या पलूस तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होत्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.मिलिंद जाधव साहेब यांनी विद्यालयाच्या विविध क्षेत्रातील प्रगतीबरोबर विज्ञानातील प्रगतीचा  आढावा घेतला. 
  गटशिक्षणाधिकारी श्री प्रसाद कालगांवकर साहेब यांनी स्वागत आणि प्रास्तविक केले.आज देशापुढे अनेक प्रश्न आहेत.ते विज्ञानाचा वापर करुन सोडविले पाहिजेत.
           या कार्यक्रमला संस्थेचे अध्यक्ष श्री.गणपतराव सुर्वे सर , विस्ताराधिकारी अशोक जाधव साहेब,रामचंद्र वरुडे,दुधोंडी गावचे सरपंच श्री.विजय आरबुने ,उपसरपंच श्री.रविंद्र नलवडे,पंचायत समिती पलुसचे श्री.धनंजय भोळे सर, श्री.अरुण कोळी सर,श्री.जयकर कुटे, संस्थेचे सर्व संचालक श्री.शंकरराव साळुंखे,श्री.महादेव चव्हाण सर ,सभासद ,हितचिंतक , विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अरविंद कांबळे सर  उपस्थित होते.
              विज्ञान प्रदर्शनाचे संयोजन व नियोजनाची जबाबदारी विज्ञानशिक्षिका साै.विजया जाधव मॅडम,श्री.राजाराम माळी  सर व सर्व शिक्षकांनी पार पाडली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री.किरण पाटील सर यांनी केले तर आभार श्री.अरविंद कांबळे सर मानले.

To Top