Sanvad News जीवनात आई वडिलांचे मोठे योगदान - हास्यकलाकार वृषभ आकिवाटे

जीवनात आई वडिलांचे मोठे योगदान - हास्यकलाकार वृषभ आकिवाटे

इंग्लिश मिडीयम स्कूल पलूस येथे पारितोषिक वितरण समारंभ


   आपल्याला ज्यांनी घडवलं मोठं केलं त्यांच्यामुळेच जीवनात  यश प्राप्त करू शकलो .त्या आई वडिलांचे आपल्या जीवनात मोठे योगदान असल्याचे मत हास्यगंध फेम हास्यकलाकार वृषभ आकिवाटे यांनी व्यक्त केले .
    ते पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे इंग्लिश मिडीयम स्कुलच्या पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एस .के. पाटील (काका), उपाध्यक्षा आशाताई पाटील (माई), सचिव धोंडीराम शिंदे यांची उपस्थिती होती.

 मुख्याध्यापिका एस.पी.आवटे यांनी स्वागत प्रास्तावना केली .विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना हास्य कलाकार वृषभ आकिवाटे यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले . प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूंचे मोठे स्थान असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासोबत त्यांनी विनोदी किस्से ,दैनंदिन जीवनात नवरा बायकोचे होणारे संवाद याची नक्कल केली .मिमिक्री ,राजकीय सिने अभिनेत्यांच्या आवाजाची सादरीकरणाला उपस्थितांनी टाळ्या, हशाने दाद दिली .विद्यार्थी मुला - मुलींसह शिक्षकवर्गाने हास्य विनोदाचा मनमुराद आनंद घेतला .

To Top