हर्षवर्धन मेटकरी व मानतेश दोडमनीचे राज्यपातळीवर घवघवीत यश
सांगली येथे झालेल्या २५ व्या राज्यस्तरीय थांग- था चॅम्पियनशीप स्पर्धेत सौ. विजयमाला पतंगराव कदम प्रशाला विटे च्या हर्षवर्धन योगेश्वर मेटकरी याने ५२ किलो. वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर प्रशालेतील विद्यार्थी मानतेश हुलगाप्पा दोडमणी या विद्यार्थ्याने अंडर ५२ किलो. वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी करत ब्राँझ पदक पटकावले. या कामगिरीमुळे दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय थांगता असोसिएशनच्या चॅम्पियनशिप साठी या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे.
भारतमाता ज्ञानपीठ ची सौ.विजयमाला पतंगराव कदम प्रशाला नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष देते. विद्यार्थ्यांचा विकासामध्ये बौद्धिक विकासाबरोबरच शारीरिक व मानसिक विकासालाही प्राधान्य प्रशालेत दिले जाते. त्यानुसार शाळेत विविध खेळांचे ही मार्गदर्शन केले जाते.यातूनच विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत, असे मत प्रशालेच्या प्राचार्या वैशाली कोळेकर यांनी व्यक्त केले.
यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील क्रीडा शिक्षक आसिफ मुजावर , गणेश बाबर ,रवी पवार यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक रघुराज मेटकरी,अध्यक्षा रेखा शेंडगे, प्राचार्या वैशाली कोळेकर ,कार्यवाह योगेश्वर मेटकरी ,सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व पालक यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.