भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी ता.पलूस येथे शालेय क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.शाळेच्या शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सचिन खंडेराव पाटील व माता पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ उर्मिला राहुल चौगुले यांच्या हस्ते समारंभ संपन्न झाला.अध्यक्षस्थानी भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक संजय कदम होते.प्राथमिक विभाग प्रमुख प्रा.सौ.मनीषा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा प्रमाणापत्र व बक्षीसे देऊन गौरव करण्यात आला.सचिन पाटील व उर्मिला चौगुले यांनी आपल्या मनोगतातून गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलतांना संजय कदम म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये असणारे सुप्त गुण ओळखून त्यास योग्य असे
व्यासपीठ देणे गरजेचे असते.याच हेतूने खाजगी मराठी प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांसाठी राबवित असलेले उपक्रम कौतुकास्पद असे आहेत.
क्रीडा विभागप्रमुख संजय पाटील यांनी क्रीडा विभागाचा अहवाल आपल्या मनोगतातून सादर केला.
सौ.सुचिता पाटील,नितीन गुरव,सोहन पाटील,घनश्याम पोतदार,श्रीधर मोरे,त्रिशला पाटील,सौ.राजश्री ऐतवडे,सौ.स्वाती पाटील,सौ.गायकवाड,अभिजित वाळवेकर ,प्रवीण पाटील आदीसह पालक उपस्थित होते.
प्रस्ताविक व स्वागत मुख्याध्यापक सुकुमार किणीकर यांनी, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा काटे यांनी,बक्षीस वितरण सूत्रसंचालन-संध्याराणी भिंगारदिवे यांनी तर आभार-सौ.छाया गायकवाड यांनी मानले.