Sanvad News रंगोत्सव स्पर्धेत भिलवडी इंग्लिश मिडीयम स्कूलची सुवर्ण भरारी...

रंगोत्सव स्पर्धेत भिलवडी इंग्लिश मिडीयम स्कूलची सुवर्ण भरारी...

प्रिती माळी देशात दुसरी; तीस विद्यार्थ्यांना सुवर्णपदके.

             रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई यांनी आयोजित केलेल्या रंगोत्सव स्पर्धेत भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश प्रायमरी & हायस्कूल भिलवडी  जि.सांगली येथील  प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत ३० गोल्ड मेडल मिळवून इतिहास निर्माण केला. यामध्ये प्रशालेची विद्यार्थिनी कु.प्रिती जगदीश माळी राष्टीयस्तरावर व्दितीय क्रमांक मिळवत हीने देशात मानाचा चांदीचा चषक पटकाविला. प्रशालेचा विद्यार्थी  सारंग महेश शिंदे याने रंगभरण स्पर्धेमध्ये तृतीय प्रथम क्रमांक पटकावून सन्मानाची ट्रॉफी प्राप्त केली. याशिवाय प्रशालेच्या कु़ वैभवी सुहास कुलकर्णी व कु आर्या अवधुत पाटील  यांनी आर्ट मेरिटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आर्ट मेरीट ट्राफी  पटकावले.तसेच प्रशालेतील शिशुमंदिरातील विद्यार्थी कु. निशिगंधा मिरजकर व साईशा पवार यांनी रंगभरण स्पर्धेमध्ये उत्कुष्ट कामगिरी करुन गोल्ड मेडल लंच बाॅक्स मिळवून आपला ठसा उमटविला आहे.
          प्रशालेतील इ.१ली मधील कु. अनन्या कुडाळकर  व इतर ९ वी मधील कु. परिमल कदम यांनी राष्टीयस्तरावर उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना रंगोत्सव तर्फे सर्टिफिकेट देण्यात आले.
                प्रशालेने स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल संस्थेचे संचालक श्री़ गिरीश चितळे यांच्या हस्ते 
स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या विदयार्थी व शिक्षकांचा अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सेक्रेटरी  एस .एन .कुलकर्णी ,विभाग प्रमुख श्री.के डी पाटील , श्री.मानसिंग हाके, के .जी. विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता माने व हायस्कूलच्या मुख्याध्यापिका कु.विद्या टोणपे उपस्थितीत होते. प्रशालेतील कला शिक्षिक श्री. गजानन चव्हाण,सौ.संगिता चौगुले व सौ.सानिया कुलकर्णी,यांना 'कलामित्र' पुरस्कार व सौ. सुप्रिया पवार यांना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.तसेच,के.जी. विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. स्मिता माने, व इंग्लिश प्रायमरी अँड हायस्कूल च्या मुख्याध्यापिका कु.विद्या टोणपे यांना द्रोणाचार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रशालेस ,उच्चतम सहभागाचा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार विभाग प्रमुख श्री. के.डी.पाटील यांनी स्विकारला.
       कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. शिलप्रभा किणीकर व आभार सौ. सानिया कुलकर्णी यांनी मानले.
To Top