Sanvad News पं.विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला हेरिटेज वॉक.

पं.विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला हेरिटेज वॉक.


           पलूस येथील विष्णू दिगंबर पलूसकर माध्यमिक विद्यालयातील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी हेरिटेज वॉक या उपक्रमाअंतर्गत पलूस मधील ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. सर्व विदयार्थ्यांना पलूस मधील विविध ठिकाणांची माहिती होण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते.छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून हेरिटेज वॉक ची सुरुवात करण्यात आली .पलूस चे ग्रामदैवत श्री समर्थ धोंडीराज महाराज मंदिर ,हूतात्मा स्मारक, ब्रिटिश कालीन तळे,नगरपरिषद ,तलाठी कार्यालय, स्वामी विवेकानंद वाचनालय, महादेव मंदिर ,गावभाग, ऐतिहासिक परांजपे वाडा ,, पलूस सहकारी बँक इत्यादी ठिकाणी भेटी दिल्या व इतिहास समजून दिला. या हेरिटेज वाॅक प्रसंगी श्री धोंडीराज महाराज मंदिर येथे मुख्य पुजारी कुमार पाटील,पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत कदम, उद्योजक डेव्हिड जाधव ,सोमनाथ होमकर, नगरसेवक दिलीप जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मंदिराची माहिती दिली.


           हुतात्मा स्मारक पलूस येथे नगरपरिषदेचे गटनेते मा. सुहास पुदाले (साहेब),उद्योजक मा.मोहन सुतार काका यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी काय केले पाहिजे हे सांगितले.ऐतिहासिक परांजपे वाडा येथे मा.संजय परांजपे दादा, पलूस सहकारी बँक येथे बँकेचे सर्व अधिकारी,सतीश पवार (साहेब )यांनी हेरिटेज वाॅक उपक्रम प्रसंगी भेटी देऊन मार्गदर्शन केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. टी. जे. करांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास शिक्षक मा.बाळासाहेब चोपडे सर ,सुनील पुदाले सर यांनी या उपक्रमाचे आयोजन केले.संस्थेचे अध्यक्ष मा.उदय परांजपे (साहेब ),सचिव मा.शहा साहेब ,उपाध्यक्ष मा.सुनिल रावळ (तात्या) संचालक मा.संजय परांजपे दादा, मा.विश्वास (भाऊ)रावळ यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
To Top