पलुस तालुक्यातील बालगंधर्व नगरी नागठाणे येथील सुप्रसिद्ध कवि रमजान मुल्ला यांना 'लोक साहित्य गौरव सन्मान' जाहीर झाला आहे. लोक साहित्य परिषद, हिंगणघाट वर्धा वतीने हा सन्मान देण्यात येतो.
गेल्या तीस वर्षापासून लोक साहित्य प्रबोधन मंच,द्वारा संचालित लोक साहित्य परिषद हिंगणघाट जि.वर्धा सातत्याने चर्चासत्र,प्रबोधनपर व्याख्यान,कवी संमेलन तथा थोरा मोठ्यांच्या जयंती पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित करीत आलेली आहे. पुस्तकांचे प्रकाशन सुध्दा संस्था करीत असते. मागील वर्षापासून लोक साहित्य गौरव हा सन्मान देण्यात येत आहे. या वर्षीचा हा दुसरा सन्मान कवि रमजान मुल्ला यांना बहाल करण्यात येत आहे.कृष्णाकाठच्या या कविला विदर्भातील लोक साहित्य प्रेमींनी दिलेल्या सन्मानाबद्दल जिल्ह्याच्या साहित्य विश्वात रमजान मुल्ला यांच्या वर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पहिला सन्मान बि-हाडकार अशोक पवार यांना बहाल करण्यात आला. विदर्भ लोक रत्न व लोक साहित्य गौरव हे दोन्ही सन्मान प्रतिष्ठेचे आहेत. पहिला विदर्भ लोक रत्न विदर्भातील प्रसिद्ध साहित्यिक स्व.शंकर बडे यांना मरणोत्तर देण्यात आला. या वर्षी चा हा चवथा सन्मान आहे. पाच हजार रोख रक्कम स्मृतीचिन्ह असे दोनही सन्मानाचे स्वरुप आहे. आपणास लोक साहित्य गौरव हा सन्मान दि. ०९ फेब्रुवारी २०२०ला हिंगणघाट येथे 'एक रात्र कवितेची' या कार्यक्रमात मान्यवरांचे हस्ते बहाल करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात कवि रमजान मुल्ला यांच्या सह शरद धनगर अमळनेर, नितीन वरणकार अकोला, संतोष कोकाटे अकोला आदींचा समावेश असून गोपाल मापारी अकोला हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.
एक रात्र कवितेची' हा विनोदाने शिगोर प्रबोधनपर कवितांचा कार्यक्रम संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. आता पर्यन्त फ.मु.शिंदे,प्राचार्य सुरेश शिंदे, रामदास फुटाणे,अशोक नायगावकर,भारत दौंडकर,किशोर बळी,मिर्झा बेग,प्रा.ज्ञानेश, वाकुडकर,नितीन देशमुख,नारायण पुरी,आबेद शेख, कलिमखान सर,विठ्ठल वाघ, अल्का तालणकर,मीरा ठाकरे,कविता डवरे,जयंत चावरे. गौतम गुडधे,राजा धर्माधिकारी, अरविंद भोंडे,किशोर मुगल,पुरुषोत्तम गावंडे, सुधिर मुळीक इत्यादी नामवंत मंडळींनी हजेरी लावली आहे.
हा सन्मान शेतकरी व संवेदनशील कवी रमजान मुल्ला यांना देतांना आम्हाला आनंद होत आहे. अशी भावना लोक साहित्य विचार मंचचे ज्ञानेश्वर चौधरी यांनी व्यक्त केली.