भरमसाठ शालाबाहय कामे, सततची प्रशिक्षणे, शैक्षणिक शिबीरे याचा परिणाम शालेय कामकाजावर होत असताना शिक्षकांना दिलेल्या मतदार यादीच्या कामावर शिक्षकांनी आज बहिष्कार घातला. पलूस तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येत तहसीलदार राजेंद्र पोळ यांना बीएलओ कामाबाबत निवेदन दिले. बीएलओ कामावर वर्षभरातील शंभरहून अधिक दिवस खर्च होत आहेत. जनगणना, निवडणूक अशी कामे महत्त्वाची आहेत.
पण सध्या सुरु असलेल्या मतदार यादी सर्वेक्षणाचे काम जोखमीचे आणि वेळखाऊ आहे. यामुळे शालेय कामकाजावर याचा परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जोपासण्या साठी शिक्षक संघटना आणि सर्व बीएलओ यांनी या कामावर बहिष्कार घालत असलेचे निवेदन दिले.शिक्षक आमदार श्री कपिल पाटील यांनी जिल्हाधिकारी सांगली यांना दिलेले पत्रही तहसीलदार श्री पोळ यांना देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालया कडून या बाबत मार्गदर्शन घेवून योग्य निर्णय घेवू असे श्री पोळ यांनी सांगितले.
यावेळी नायब तहसीलदार राजेंद्र पाटील संगीता खोमने राज्य शिक्षक संघाचे उपाध्यक्ष हंबीरराव पवार शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुरेश खारकांडे शिक्षक समितीचे अध्यक्ष प्रदीप मोकाशी सरचिटणीस संदीप कांबळे नारायण माळी अमर कांबळे प्रशांत राठोड इ. संघटना पदाधिकारी, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस रोहित नलवडे उपस्थित होते. निवेदनावर जालिंदर गावडे रंगराव चोरुमले लक्ष्मण शिंदे सिराज सुतार अनिल कोळी आण्णाप्पा गुडमणी विलास मोहिते राजेंद्र सागरे साबिर शिकलगार बळवंत कुंभार इ. बीएलओनी सहया करुन मतदार यादी कामातून मुक्त करावे अशी मागणी केली आहे.