Sanvad News महालक्ष्मी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज देशिंग हरोली येथे पारंपारिक दिन साजरा.

महालक्ष्मी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज देशिंग हरोली येथे पारंपारिक दिन साजरा.


महालक्ष्मी हायस्कूल व ज्युनिअर काॕलेज देशिंग हरोली (ता.कवठेमहांकाळ ,सांगली)येथे आज पारंपारिक दिनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून  सुप्रसिद्ध कवी प्रा.सुनिल तोरणे व अभिजीत पाटील उपस्थित होते.त्यांनी  कवितावाचन करुन आपली  लेखनाची भूमिका मांडली तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .कवयिञी सुरेखा कांबळे यांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.लिंबू चमचा स्पर्धा मुलींसाठी घेण्यात आली.यशस्वी स्पर्धकांचे बक्षिस वाटप प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले.सूञसंचालन सौ.मनिषा पाटील यांनी केले.स्वागत प्रास्तविक संजय आसुदे यांनी केले .विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले .आभार सौ.सुरेखा कांबळे यांनी मानले.यावेळी साळुंखे सर व बनसोडे सर उपस्थित होते.ज्ञानदान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  जयराज घोरपडे सरकार,सचिव बाळासाहेब भोसले व मुख्याध्यापिका सौ.प्रतिभा भोसले यांचे प्रोत्साहन लाभले.कार्यक्रमाचे नियोजन सौ.सुरेखा कांबळे व सौ.मनिषा पाटील यांनी केले.
To Top