Sanvad News क्षितिज प्रायमरी स्कूल बुरुंगवाडी मध्ये बालिका दिना निमित्त वेशभूषा स्पर्धा उत्साहात संपन्न..

क्षितिज प्रायमरी स्कूल बुरुंगवाडी मध्ये बालिका दिना निमित्त वेशभूषा स्पर्धा उत्साहात संपन्न..

        
            सिद्ध विनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित क्षितिज प्रायमरी स्कूल ,बुरुंगवाडी,ता. पलूस येथे सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या वेशभूषा स्पर्धा घेण्यात आल्या.संस्थेचे संस्थापक मा.सुनील जाधव व संस्थेच्या कार्यवाह वनिता जाधव यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

   विद्यार्थ्यांनी डॉक्टर, पोलिस, वारकरी,परी,भाजीवाले,गाडगेबाबा,डॉ,बाबासाहेब आंबेडकर,शेतकरी,जिजामाता,मल्हारी,खंडोबा,पत्रकार, सावित्रीबाई फुले,नवरी,झाशीची राणी,माताअनुसया,कोळी,सैनिक ,लक्ष्मी माता,धनगर,लोकमान्य टिळक,राधाकृष्ण अशा वेगवेगळ्या वेशभूषेतून प्लास्टिक बंदी,स्वच्छतेचे,आरोग्याचे,शेतकरी मनोगत,बेटी बचाओ बेटी पाढाओ ,शिक्षणाचे ,खरी देशभक्ती असे सामाजिक संदेश देण्यात आले.
   मुख्याध्यापिका दीपाली जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या धाडसाबद्दल कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी पाटील व आभार ज्योती कोकाटे यांनी मानले. सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी  या कार्यक्रमाचे नियोजन केले.
To Top