Sanvad News सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी येथे पत्रकार दिन साजरा..

सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी येथे पत्रकार दिन साजरा..

     भिलवडी ता. पलूस येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला.अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव संजय कुलकर्णी होते.जेष्ठ पत्रकार सतीश तोडकर यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आला.भिलवडी शिक्षण संस्थेचे सचिव संजय कुलकर्णी, मुख्याध्यापिका शुभांगी मन्वाचार,पर्यवेक्षक संभाजी माने यांच्या हस्ते पत्रकार सतिश तोडकर,दत्ता उतळे,अभिजित रांजणे,घनश्याम मोरे,चंद्रमनी रांजणे,शरद जाधव,शशिकांत कांबळे,पंकज गाडे,रोहित रोकडे,विशाल कांबळे,सूरज शेख आदी पत्रकारांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.पत्रकारांच्या वतीने दत्ता उतळे, अभिजित 
रांजणे, रोहित रोकडे यांनी मनोगत व्यक्त केले.
     प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापिका शुभांगी मन्वाचार यांनी केले,सूत्रसंचालन के.डी. पाटील यांनी तर आभार पर्यवेक्षक संभाजी माने यांनी मानले.यावेळी मराठी विभागप्रमुख संजय मोरे,सुनिल भोये,सी.एस.पाटील, रुपेश कर्पे, बी.एन.शिकलगार,टी. एस.पाटील,के.आर.पाटील,
ज्ञानेश्वर भगरे आदी उपस्थित होते.
To Top