समाजगौरव शैक्षणिक - सामाजिक बहुउद्देशीय संस्था, कोल्हापूर व शाहू शिक्षण संस्था, पंढरपूर- इंचलकरजी यांच्या विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय विचार साहित्य संमेलन इचलकरंजी यांच्या वतीने दिला जाणारा "महाराष्ट्र लोकरत्न सेवा पुरस्कार २०२०" या राज्यस्तरीय' पुरस्कार श्री.भारत बंडगर विषयतज्ञ, पंचायत समिती तासगांव. यांना अनाथाची कैवारी थोर समाजसेविका मा.सिंधुताई सपकाळ यांच्या शुभ हस्ते श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी येथे पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.पदक, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप होते. या कार्यक्रमास माजी मंत्री श्री. लक्ष्मणरावजी ठोबळे, माजी आमदार श्री. राजू आवळे, संमेलनाध्यक्ष यादव,अँड.सदाशिव काळे मुंबई हायकोर्ट, कांदिवली. श्री.सुधीर जाधव उद्योजक कणकवली, श्री.अब्राहम आवळे ,अध्यक्ष शाहु शिक्षण संस्था पंढरपूर संचलित इचलकरंजी, सौ.जयश्रीताई सावर्डेकर समाजसेविका मुबंई, उद्योजक श्री.कौशिक गायकवाड, प्रा.वैभव खानविलकर, श्री.सरडे महाराज, प्रा. बी.एन.खरात सिंधुदुर्ग. यांच्या उपस्थितीत पार पडला.
श्री.भारत बंडगर यांनी साहित्य क्षेत्रात व लेखन कार्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आज पर्यत अनेक दर्जेदार साहित्य निमिती केली अाहे. कथालेखन, निबंधलेखन, प्रवासवर्णन, स्वःनुभव लेखन, क्षेत्रभेट लेखन, युजीसी अंतर्गत विद्यापीठ पेपर लेखन व सादरीकरण, नाविण्यपूर्ण नवोपक्रम लेखन, पुस्तक प्रकाशन, सामाजिक क्षेत्रातील लेखन यासारख्या वैशिष्टपूर्ण लेखनातून शैक्षणिक विकासाला फार मोठी मदत झाली आहे.
त्यांना डाॅ. रमेश होसकोटी, प्राचार्य- डाएट सांगली. तासगांव तालुका विभाग प्रमुख, डाॅ.विकास सलगर, डाएट सांगलीचे डाॅ.राजेंद्र भोई, डाॅ.तुकाराम राजे, श्री.फरांदे सर, श्री.हिप्परकर सर, डाॅ.भोई मॅडम, श्री.महेश धोत्रे, उपशिक्षणाधिकारी(प्राथ.) जिल्हा परिषद सांगली तथा गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, तासगांव. श्री.प्रकाश काबंळे, सौ.शामल माळी, श्रीम.गीता शेंडगे. शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती, तासगांव. श्री.नितीन रास्ते, श्री.सुनिल चव्हाण, श्री.अशिष भंडारे, श्री.दयानंद घाडगे. येळावी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.बापूसो हजारे, ग्रामिण कथाकार श्री. सचिन पाटील, श्री. महादेव माने, जनसेवा अारोग्य व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, डाॅ.विजय पवार, श्री.रामचंद्र देशमाने, श्री.प्रमोद पवार, श्री.विनोद गवळी, कर्नाळ ट्राॅकिंग ग्रुपचे श्री.कुमार पुजारी, श्री.सुनिल पाटिल, श्री.चंद्रकांत लोहार, श्री.बलराज कदम, श्री.प्रकाश जाधव. कर्नाळ ग्राम वाचनालयाचे ग्रंथपाल श्री. गणेश कदम, शिक्षक भारती संघटना सांगली सरचिटणीस श्री.कृष्णा पोळ, उपाध्यक्ष श्री.दिपकराव काळे, श्री. सुरेश खारखांडे, यांनी मनपुर्वक अभिनंदन केले.