सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पंतसंस्थेच्या वतीने महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कटारे यांचा सत्कार करण्यात आला.क्रांती उदयोग व शिक्षण समूहाचे प्रमुख मा.अरूण आण्णा लाड यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, शाल,फेटा, श्रीफळ देऊन त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.
आदर्श समाज शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक परिषदेच्या
सांगली जिल्हाध्यक्षपदी त्यांची फेरनिवड झाली आहे.या बद्दल सांगली जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक सहकारी पंतसंस्था लि. सांगलीच्या वतीने अभिदनंदन पर सत्कार करण्यात आला.यावेळी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ.संगिता लाड,व्हा. चेअरमन सौ. यु.आर. गुरव,संभाजी माने,संजय मोरे आदींसह सर्व पदाधिकारी, संचालक उपस्थित होते.