Sanvad News आनंदी जीवनासाठी विवेकी विचारांची गरज तानाजी जाधव : सावर्डे येथे व्याख्यान

आनंदी जीवनासाठी विवेकी विचारांची गरज तानाजी जाधव : सावर्डे येथे व्याख्यान


जीवन आनंदाने जगायचे असेल तर विवेकी विचारांचा स्विकार केला पाहिजे, असे प्रतिपादन प्रतिष्ठा फौंडेशनचे अध्यक्ष तानाजी जाधव यांनी केले. 
                  कोणत्याही गोष्टीचा विवेकाने विचार केला तर निश्चितपणे आयुष्य आनंदी होऊन जाते.
तासगाव येथील पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाच्या सावर्डे (ता. तासगाव) येथील विशेष श्रमसंस्कार शिबिरात ते विवेकी आनंद शोधावा या विषयावरील व्याख्यानात बोलत होते.  सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अभिजित राऊत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सरपंच प्रदीप माने होते.
तानाजी जाधव, म्हणाले, स्मार्टफोनचा विवेकाने वापर केला तर आपण स्मार्ट होऊ शकतो. अन्यथा अधोगतीपासून आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही. जीवनात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी तरूणाईने व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. सामाजिकतेचे भान ठेवावे. सावित्रीबाई फुले यांचा वारसा सांगणाºया मुलींनी सक्षम होण्यासाठी विवेकी विचारांचा अवलंब करावा. राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी आयुष्यात कधीच खचून जात नाही कारण त्याची दृष्टी सकारात्मक झालेली असते. स्वामी विवेकानंदांनी युवकांच्या कल्याणाचा जो राजमार्ग सांगितला आहे तो आपल्या आयुष्याला आनंद देणारा आहे.
डॉ. तातोबा बदामे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. हाजी नदाफ यांनी आभार मानले. प्रा.आण्णासाहेब बागल यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रम अधिकारी डॉ. अमोल सोनवले. डॉ. पी. बी. तेली, प्रा. एस. आर. घोगरे, प्रा. कीर्ती कोलप, डॉ. डी. बी. थोरबोले, प्रा. सुनिल गावीत, उपसरपंच तानाजी माने, ग्रामपंचायत सदस्य समाधान साळुंखे, सर्जेराव गुरुजी, प्रल्हाद माने, ज्येष्ठ लेखक मोहन माने उपस्थित होते.
फोटो ओळी : तासगाव येथील पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाच्या सावर्डे (ता. तासगाव) येथील विशेष श्रमसंस्कार शिबिरात प्रतिष्ठा फौंडेशनचे अध्यक्ष तानाजी जाधव यांचे व्याख्यान झाले.
To Top