मातांनी विदयार्थ्यांवर साने गुरुजींच्या आईसारखेच संस्कार करावेत.पालकांनी स्मार्ट फोन-मोबाईल, टी.व्ही. मालिका या पासून मुलांना दूर ठेवावे व संस्कारक्षम व बोधात्मक मालिका दाखवाव्यात असे आवाहन महाराष्ट्र राज्य खाजगी मराठी प्राथमिक शिक्षक परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कटारे यांनी केले.
श्री रामराव विदयामंदिर प्राथमिक शाळा जत येथे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते.जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त वरिष्ठ चंद्रकांत चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये व एस.आर. व्ही. एम.माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक मा.व्ही.डी. काटकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.
यापुढे बोलतांना बाळासाहेब कटारे म्हणाले की, अनेक स्तुत्य उपक्रमाने शाळा नेहमीच पालकांच्या चर्चेत असते. या शाळेचे अनेक विद्यार्थी आज अनेक मोठया सेवेत कार्यकरत आहेत. जत शहरातील एक नामवंत व दर्जेदार शिक्षण देणारी शाळा आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यकमाची सुरवात केली.
मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विदयार्थ्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आली. शाळेतील विदयार्थी व शिक्षक यांच्या प्रयत्नातून तयार केलेल्या "चिवचिवाट" काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
प्रास्ताविक व स्वागत शाळेचे मुख्याध्यापक राजू कोळी यांनी केले. सूत्रसंचालन श्री.फाटक सरांनी तर आभार श्री.कारंडे सरांनी मानले.शाळेचे पर्यवेक्षक पी.बी.कदम सर, पर्यवेक्षिका मा.एस.के. सावंत मॅडम आदींसह शिक्षक, पालक,विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.