सन्मान शिक्षण संस्थेच्या सन्मान करिअर अकॅडमी माळवाडी ,आदर्श बालक मंदिर प्राथमिक शाळा माळवाडी व सन्मान पब्लिक स्कूल माळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त सन्मान शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक संकुलात ध्वजारोहण ,डेमो डे ,रक्तदान शिबिर इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगाव चे माजी मुख्याध्यापक श्री अशोक रामचंद्र साठे तर अध्यक्षस्थानी सुखवाडीचे माजी सरपंच मा.श्री .हेमराज रामराव यादव उपस्थित होते .प्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.रक्तदान शिबिराचे उदघाटन सुखवाडी गावाच्या पोलीस पाटील सौ अमृता अनिकेत जगताप यांच्या हस्ते करण्यात आले .
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने घेतलेल्या कार्यक्रमात सन्मान करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत थाळी, जम्प ऍक्ट ,रोलिंग ऍक्ट, हाय जम्प ऍक्ट, मानवी मनोरे, त्रिकोणी पिरॅमिड ,ब्रेकिंग डेमो , रायफल शूटिंग , आर्मी ड्रिल इत्यादी साहसी प्रात्यक्षिके सादर केली.तर आदर्श बालक मंदिर प्राथमिक शाळा माळवाडी व सन्मान पब्लिक स्कूल माळवाडीच्या विद्यार्थ्यांनी रिंग कवायत, बांबू कवायत , मानवी मनोरे व लेझीम नृत्य सादर केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री. अशोक रामचंद्र साठे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना सध्याची शैक्षणिक परिस्थिती व स्पर्धा या विषयी मार्गदर्शन केले .
या प्रसंगी सन्मान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. प्रा. संजय यादव , सन्मान करिअर अकॅडमी माळवाडीचे प्रमुख मा.श्री. प्रशांत जाधव, सन्मान पब्लिक स्कूल माळवाडीच्या मुख्याध्यापिका सौ सुजाता औताडे, आदर्श बालकमंदिर प्राथमिक शाळा माळवाडीच्या मुख्याध्यापिका सौ लता पाटील , सुबराव बापू यादव बालशिक्षण मंदिर माळवाडीच्या बालवाडी विभाग प्रमुख सौ प्रमिला येसुगडे , मा.श्री. विकास जंगले सर , मा.श्री. अर्जुन गेंड सर , मा.श्री . वैभव यादव सर , मा. श्री. पवार सर , मा.श्री.माने सर , मा .श्री . रमेश बारीस सर , सौ सविता महिंद मॅडम, माधवी कदम मॅडम ,मा.श्री. किरण गायकवाड, मा.श्री. संतोष कांबळे तसेच स्थानिक परिसरातील पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मा.श्री. प्रशांत जाधव यांनी केले तर आभार प्रतिक्षा फार्ने यांनी मानले.