Sanvad News भिलवडी शिक्षण संस्थेत विविध कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न;पर्यावरण पूरक देश उभारणीसाठी संघटित प्रयत्नांची गरज-प्रशांत देशपांडे

भिलवडी शिक्षण संस्थेत विविध कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न;पर्यावरण पूरक देश उभारणीसाठी संघटित प्रयत्नांची गरज-प्रशांत देशपांडे


भिलवडी ता. पलूस येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या संकुलातील विविध शाखांमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला.पर्यावरण पूरक देश उभारणीसाठी संघटित प्रयत्न गरजेचे आहेत,यासाठी विद्यार्थी दशेपासून  सुुरुवात करा असे प्रतिपादन प्रशांत देशपांडे मानद सचिव तुळजाभवानी शिक्षण मंडळ इस्लामपूर यांनी केले.भिलवडी शिक्षण संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
 सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भिलवडी या शाखेमध्ये प्रशांत देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
प्रारंभी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविका चे सामूहिक वाचन करण्यात आले.
 बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडी येथे संस्थेचे संचालक प्रा.आर. डी. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

खाजगी मराठी प्राथमिक शाळा भिलवडी येथे संस्थेचे संचालक डी.के. किणीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. 

इंग्लिश मिडीयम स्कूल भिलवडी येथे भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक व्यंकोजी जाधव यांनी ध्वजारोहण केले.

या सोहळ्यास उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब चोपडे,विश्वस्त जे. बी.चौगुले,संचालक दादासाहेब चौगुले, डॉ. सुनिल वाळवेकर, प्रा.धनंजय पाटील,जयंत केळकर,संजय कदम,संस्था सचिव संजय कुलकर्णी,पर्यवेक्षक संभाजी माने,प्राचार्य डॉ. श्रीकांत चव्हाण, मुख्याध्यापक सुकुमार किणीकर, सौ.विद्या टोणपे,सौ.स्मिता माने,सौ.जोशीआदींसह विविध मान्यवर,नागरिक,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.सूत्रसंचालन संजय मोरे यांनी केले

संकुलातील विविध शाखांमधील विद्यार्थ्यांनी संचलन,समूहगीते,देशभक्तीपर नृत्ये,मुकनाट्ये,सायलेंट ड्रिल,साधनयुक्त कवायती,सामुदायिक कवायतीची प्रात्यक्षिके सादर केली.

To Top