Sanvad News पलूस शहरातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी पाहिला तान्हाजी-द अनसंग वॉरियर' हा चित्रपट.

पलूस शहरातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी पाहिला तान्हाजी-द अनसंग वॉरियर' हा चित्रपट.


शिवसेनेच्या वतीने 'तान्हाजी-दअनसंग वॉरियर' हा ऐतिहासिक चित्रपट पलूस शहरातील प्राथमिक शाळांना मोफत दाखवण्यात आला..
   पलूस शहरात शिवशंकर चित्रपटगृहात आज जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 पलूस, जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 पलूस, जिल्हा परिषद शाळा आंबेगाव वसाहत, जिल्हा परिषद शाळा क्रमांक 3 पलूस, जिल्हा परिषद शाळा सांडगेवाडी, जिल्हा परिषद शाळा शिवाजीनगर, जिल्हा परिषद शाळा गोंदील वाडी आदी शाळातील  विद्यार्थ्यांना वरिष्ठ कार्यालयाच्या तोंडी सूचनेनुसार आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पलूस शहर शिवसेना शाखा, युवा सेना शाखा यांच्या सहकार्याने हा ऐतिहासिक चित्रपट मोफत दाखविण्यात आला. याप्रसंगी शिवसेना नेते अँड. सुभाष वाकळे, विनायक गोंदील ,संदीप कुंभार यांच्यासह सर्व पदाधिकारी ,शिक्षण विस्ताराधिकारी अशोक जाधव, पलूस केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती सुवर्णा कोळी, गटसाधन केंद्राकडील विषय तज्ञ थोरात मॅडम ,शाळा क्रमांक दोनच्या मुख्याध्यापिका सौ मालन आवटे, शिक्षक संघटना समन्वय समितीचे मारुती शिरतोडे, राम चव्हाण, बाळासाहेब खेडकर, जगन्नाथ शिंदे ,संभाजी पाटील यांच्यासह  शिक्षिका संगीता पाटील, श्रीमती वनिता कांबळे , उत्कला आढाव, पुष्पा पाटील सह सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. ऐतिहासिक चित्रपटातील द्रुष्ये पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. शिक्षण विभाग व शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा झालेला विशेष उपक्रम सर्वांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहिला.  सदरच्या उपक्रमाबाबत गटशिक्षणाधिकारी प्रसाद कालगावकर साहेब यांचे पालक व विदयार्थी वर्गाकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
To Top