या..ताई...मावशी...आक्का...मामा..काका..दादा..ताजी ताजी भाजी घ्या...आमच्याकडचा कांदा चवीला लय भारी आणि स्वस्तात मस्त..होल इंडियात असला माल मिळायचा न्हाय...काय बी घ्या ...बुरुंगवाडी तल्या क्षितिज बाजार मध्येच घ्या...ग्राहकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या आरोळ्या ऐकल्या की आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो...आठवडी बाजार..नेमके हेच चित्र आज नागरिक व पालकांनी अनुभवले..बाजार तोच पण व्यापारी मंडळी मात्र चिमुकली..व्यवहार आणि आकडेमोडीला मोठयां ना ही भारी पडतील अशी...
सिद्ध विनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बुरुंगवाडी ता. पलूस येथील क्षितिज गुरुकुल विद्यानिकेतन मध्ये सामाजिक बांधिलकी,व्यावहारिक ज्ञान ,उद्योगी वृत्ती,विध्यार्थी सक्षम बनण्यासाठी "क्षितिज बाजार" या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष मा.सुनील जाधव व कार्यवाह सौ.वनिता जाधव यांच्या हस्ते सरस्वती पूजन व क्षितिज बाजाराचे उदघाटन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी भाजीपाला,माळवे,फळे,कापडी पिशव्या,शालेय स्टेशनरी,घरगुती बनवलेले खाद्यपदार्थ,विणलेल्या वस्तू,बियाणे, सौन्दर्यप्रसादने, पतंग,लस्सी,मट्टा,उसाचा रस अशी विविध पेये,दाबेली,पाणीपुरी,भेळ,वडापाव,
पावभाजी अशी मार्केट स्टॉल मुलांनी लावले होते.पालकांनी व ग्रामस्तानी विद्यार्थ्यांकडून वस्तू खरेदी करून त्यांना प्रोत्साहन दिले.बाजारात माल विकण्यासाठी मुलांच्या ओरडण्याचा आवाजाने वातावरण गलबलून गेले.संस्थेचे अध्यक्ष सुनील जाधव व कार्यवाह सौ.वनिता जाधव यांनीही मुलांच्याकडून साहित्य ,भाजीपाला खरेदी करून त्यांचे कौतुक केले.
या सर्व बाजारचा आनंद ग्रामस्थ,पालक व विद्यार्थी यांनी मनमुराद आनंद घेतला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी मगदूम यांनी तर आभार लता हिरुगडे यांनी केले.कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक वर्गाने केले.