Sanvad News सौ.विजयमाला पतंगराव कदम प्रशालेत प्रजासत्ताक दिन साजरा.

सौ.विजयमाला पतंगराव कदम प्रशालेत प्रजासत्ताक दिन साजरा.

       विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान दिले पाहिजे .भविष्यात चांगले जीवन जगण्यासाठी व्यवहारिक ज्ञान आवश्यक आहे .सामाजिक क्षेत्रात वावरण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्याची तयारी सौ.विजयमाला पतंगराव कदम प्रशालेत करून घेतली जाते .असे प्रतिपादन डॉ. मानाजी कदम यांनी केले.ते सौ. विजयमाला पतंगराव कदम प्रशालेत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर प्रशालेचे संस्थापक रघुराज मेटकरी,अध्यक्षा रेखा शेंडगे, संस्थेचे संचालक ऋषिकेश मेटकरी , प्राचार्या वैशाली कोळेकर,कार्यवाह योगेश्वर मेटकरी , सुनंदा टीकोळे,शिवाजी टीकोळे, शंकर लंगोटे , पंडितराव होनमाने, नंदा मेटकरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
               सुरुवातीला प्रमुख पाहुणे डॉ. मानाजी कदम यांनी ध्वजारोहण केल्यानंतर प्रशालेच्या संचलन पथकाने मानवंदना दिली.प्रशालेच्या प्राचार्या वैशाली कोळेकर यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले .यावेळी प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सानिका पाटील व ऐश्वर्या जाधव यांनी प्रशालेचा वार्षिक अहवाल सादर केला .
प्रशालेचे विद्यार्थी हर्षवर्धन मेटकरी, अंतरा उबाळे व कोमल शिवशरण यांची विविध स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रशालेचे विद्यार्थी ईशा साळुंखे,राजवीर कोळी, संचिता रुपनर व अभयराज तामखडे  यांनी मनोगते व्यक्त केले .तर कार्यक्रमास आलेल्या पाहुण्यांमध्ये रघुराज मेटकरी, सौ. सुनंदा टीकोळे व शिवाजी टीकोळे यांनी मनोगते व्यक्त करून त्यांनी दहावीमध्ये गणित व विज्ञान विषयांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे जाहीर केली .त्यानंतर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी लेझिम,कराटे, झांज,मानवी मनोरे यांची सुंदरशी प्रात्यक्षिके सादर केली .
              बहारदार अशा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी कोमल शिवशरण व ऋतुजा महाडिक यांनी केले तर आभार प्रशालेतील शिक्षक तोसिम शिकलगार यांनी मानले. कार्यक्रमास सौ.विजयमाला पतंगराव कदम प्रशालेचा सर्व स्टाफ ,पालक,विद्यार्थी व परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
To Top